७४ ‘आशां’चा पुरस्काराने सन्मान
By Admin | Published: March 31, 2016 12:11 AM2016-03-31T00:11:20+5:302016-03-31T00:35:15+5:30
बीड : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनआरएचएम) अंतर्गत उत्कृष्ट आरोग्य सेवा बजावणाऱ्या ७४ आशा स्वयंसेविकांना बुधवारी जिल्हा रुग्णालयातील धन्वंतरी सभागृहात पुरस्काराने गौरविण्यात आले.
बीड : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनआरएचएम) अंतर्गत उत्कृष्ट आरोग्य सेवा बजावणाऱ्या ७४ आशा स्वयंसेविकांना बुधवारी जिल्हा रुग्णालयातील धन्वंतरी सभागृहात पुरस्काराने गौरविण्यात आले.
जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा माता व बाल आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे हे उपस्थित होते. यावेळी जिल्हा, तालुकास्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या आशांना सन्मानीत करण्यात आले. रोख रक्कम, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
आरोग्य क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्काराचा मान केज येथील उपजिल्हा रुग्णालयास मिळाला. अधीक्षक डॉ. अशोक थोरात यांच्यासह सहकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ५० हजार रुपये व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी पुरस्कार प्राप्त काही आशांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. पी. के. पिंगळे यांनी केले. यावेळी जि. प. अध्यक्ष पंडित, वासनिक, वडगावे यांचीही भाषणे झाली. (वार्ताहर)