७४ शिक्षणसेवक झाले नियमित शिक्षक

By Admin | Published: November 16, 2014 12:15 AM2014-11-16T00:15:53+5:302014-11-16T00:38:09+5:30

बीड : जिल्हा परिषदेतील ७४ शिक्षणसेवकांना नियमित शिक्षक करण्यात आले आहे़ यासंदर्भातील आदेशाचे वाटप सभागृहात शनिवारी दुपारी तीन वाजता पार पडले़

74 teachers get regular teacher | ७४ शिक्षणसेवक झाले नियमित शिक्षक

७४ शिक्षणसेवक झाले नियमित शिक्षक

googlenewsNext


बीड : जिल्हा परिषदेतील ७४ शिक्षणसेवकांना नियमित शिक्षक करण्यात आले आहे़ यासंदर्भातील आदेशाचे वाटप सभागृहात शनिवारी दुपारी तीन वाजता पार पडले़
शिक्षण सभापती बजरंग सोनवणे अध्यक्षस्थानी होते़ जि़ प़ सदस्य माणिक मंदे, डॉ़ श्रीराम खळगे, अशोक लगड, शिक्षणाधिकारी व्ही. डी. कुलकर्णी, उपशिक्षणाधिकारी व्ही.एन. राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. तीन वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षण सेवकांना नियमित शिक्षक म्हणून आदेश देण्यात आले. त्यामुळे त्यांचा अनेक दिवसांचा प्रश्न मार्गी लागला आहे. शिक्षकांनी ज्ञानदानाचे काम प्रामाणिकपणे करावे. पिढ्या घडविण्याची महत्वाची जबाबदारी शिक्षकांकडे आहे त्यामुळे त्यांनी शिक्षणाचे पावित्र्य व प्रतिष्ठा जपली पाहिजे, असे प्रतिपादन सभापती बजरंग सोनवणे यांनी केले.
अपंग शिक्षकांना अग्रीम
जिल्हा परिषदेतील ४१ अपंग शिक्षकांना वाहन खरेदीसाठी ५० हजार रुपयांपर्यंतचे अग्रीम देण्यात येते. याच्या धनादेशाचे वाटपही झाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कक्षाधिकारी जयलाल राजपूत, संजय सोळसे, विस्तार अधिकारी बी.एन. चोपडे, महादेव चव्हाण, गणेश सारूक यांनी परिश्रम घेतले.(प्रतिनिधी)

Web Title: 74 teachers get regular teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.