करमाड येथील चारा छावणीत ७५० जनावरे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 10:33 PM2019-05-16T22:33:26+5:302019-05-16T22:35:21+5:30

करमाड येथील उपबाजारपेठेत सुरू केलेल्या चारा छावणीत पहिल्याच दिवशी जवळपास ७५० जनावरे दाखल झाली आहेत.

750 cattle in fodder camp in Karmad | करमाड येथील चारा छावणीत ७५० जनावरे दाखल

करमाड येथील चारा छावणीत ७५० जनावरे दाखल

googlenewsNext

करमाड : औरंगाबाद उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या करमाड येथील उपबाजारपेठेत सुरू केलेल्या चारा छावणीत पहिल्याच दिवशी जवळपास ७५० जनावरे दाखल झाली आहेत. छावणीत दाखल झालेल्या सर्व जनावरांना शुक्रवारी घटसर्प व फºया रोगाची लसीकरण करण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.


औरंगाबाद तालुक्यात डीएमआयसी,सोलापूर-धुळे व समृद्धी महामार्ग जात असल्याने जमीन भुसंपादनमुळे शेतकºयांच्या हातात चांगला पैसा आला. तसेच लोकसभा निवडणुकीचा काळ असल्याने चारा छावणीची मागणी पुढे आली नाही. असे असले तरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांना तालुक्यातील पाणी व चाराटंचाईची कल्पना आली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे मतदान संपताच करमाड येथे चारा छावणी सुरू करण्याचा प्रस्ताव २४ एप्रिल रोजी संबंधित विभागाकडे सादर करण्यात आला. लोकप्रतिनिधींचा रेटा वाढल्यानंतर चारा छावणी सुरू करण्यासाठी १४ मे रोजी जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदील मिळाला. चारा छावणीचे १५ मे रोजी उदघाटन करण्यात आले. १६ मे रोजी चारा छावणीत अंदाजे ४५० मोठी व ३०० लहान जनावरे दाखल झाली आहेत.

आज जनावरांचे लसीकरण
करमाड येथे चारा छावणीला प्रारंभ होताच औरंगाबाद तालुका पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाचे पशुधन विकास अधिकारी डॉ.आर.एस.दढके चार छावणीत दाखल झाले आहेत.त्यांनी व करमाड येथील पशुधन पर्यवेक्षक डॉ.के.जे.शेवतेकर यांनी गुरूवारी जनावरांची तपासणी केली.चारा छावणीत जनावरांना कुठल्याही रोगाची बाधा होऊ नये म्हणुन उद्या शुक्रवारी (दि.17) घटसर्प व फ-या रोगप्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे.चारा छावणी सुरू असेपर्यंत जनावरांना पशुवैद्यकीय सेवा मोफत असणार आहे.

 

Web Title: 750 cattle in fodder camp in Karmad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.