मराठवाड्यात ७५ हजार अॅक्टिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:04 AM2021-04-27T04:04:56+5:302021-04-27T04:04:56+5:30
ग्रामीण भाग कोरोनाच्या विळख्यात औरंगाबाद : शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोना संक्रमण झालेल्या रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे. ...
ग्रामीण भाग कोरोनाच्या विळख्यात
औरंगाबाद : शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोना संक्रमण झालेल्या रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे. मराठवाड्यातील शहरी भागात १ लाख ५६ हजार ३६७ एकूण रुग्णांची नोंद झाली आहे. ग्रामीण भागात २ लाख ७१ हजार ४२२ रुग्ण ग्रामीण भागात असल्याची माहिती समोर आली आहे.
जिल्ह्याचा मृत्यूदर दोन टक्क्यांवर
औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग होऊन दगावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. सध्या जिल्ह्याचा मृत्यूदर २ टक्क्यांवर असल्याचे विभागीय प्रशासनाच्या अहवालात म्हटले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.५२ टक्के असल्याचे अहवालात म्हटले आहे.
ग्रामीण भागात सर्वाधिक मृत्यू
औरंगाबाद : कोरोनामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण ग्रामीण भागात सर्वाधिक आहे. मराठवाड्यात आजवर ८ हजार ३२६ रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. यात शहरी भागातील ३ हजार ५४ तर ग्रामीण भागातील ५ हजार २७२ रुग्णांचा समावेश आहे. औरंगाबाद शहर व ग्रामीण मिळून सर्वाधिक २४०० रुग्ण दगावले आहेत.
चार शहरांत कन्टेन्मेंट झोन शून्य
औरंगाबाद : विभागातील जालना, हिंगोली, बीड आणि उस्मानाबाद या चार शहरांत कन्टेन्मेंट झोनची संख्या शून्यावर आली आहे. तसेच ग्रामीण भागातील झोनची संख्या देखील कमी होत आहे. कोेरोनाच्या पार्श्वभूमीवर आठ शहरांत सध्या कन्टेन्मेंट झोनची संख्या २५९ आहे.