औरंगाबादमध्ये ७६७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 01:33 PM2020-11-24T13:33:45+5:302020-11-24T13:35:46+5:30
जिल्ह्यातील एकूण ४०,५९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत
औरंगाबाद : जिल्ह्यात १४१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली, तर दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात ९५ जणांचे उपचार पूर्ण झाल्याने त्यांना विविध रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यात मनपा हद्दीतील ९०, तर ग्रामीण मधील ५ रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत ४२ हजार ५०० कोरोनाबाधित जिल्ह्यात आढळून आले. त्यापैकी ४० हजार ५९७ जण बरे होऊन उपचार पूर्ण झाल्याने घरी परतले. तर आजपर्यंत ११३६ जणांचा मृत्यू झाला असून ७६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. घाटी रुग्णालयात कन्नड येथील ८० वर्षीय महिला व खासगी रुग्णालयात मुकुंदवाडीतील ५८ वर्षीय पुरुष कोरोनाबाधिताचा उपचारादम्यान मृत्यू झाल्याची माहिती सोमवारी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
ग्रामीण भागातील १६ रुग्ण
लासूर स्टेशन १, जिल्हा परिषद शाळा, तुर्काबाद १, जिल्हा परिषद शाळा, खराडी १, शिऊर बंगला, वैजापूर १, अन्य १२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
महानगरपालिका हद्दीत १२५ रुग्ण
शिवाजीनगर २, कामगार चौक, चिकलठाणा २, न्यू बिगिनिंग स्कूल, सावंगी १, दशमेशनगर १, जैन इंटरनॅानल स्कूल, बीड बायपास परिसर १, एन-३ सिडकाे १, छत्रपतीनगर, गारखेडा १, पारिजातनगर १, जयभवानीनगर १, एन-४ सिडको १, भास्कर वास्तू कृती, मिटमिटा २, हर्सूल सावंगी १, सराफा रोड, परिसर १, ज्योतीनगर १, सैनिक स्कूल १, जालाननगर १, उल्कानगरी १, वेदांतनगर २, टिळकनगर १, पोलीस कॉलनी , पडेगाव १, किलबिल प्रायमरी स्कूल १, जिल्हा परिषद परिसर १, राधास्वामी कॉलनी १, भगतसिंगनगर, हर्सूल १, हर्सूल जेल कॉटर्स १, मयूरपार्क १, जाधवडी हर्सूल १, युगांतर सोसायटी, हडको १, पवननगर, एन ९ येथील १, अशोकनगर हर्सूल १, एन-९ संत ज्ञानेश्वरनगर १, दिशाधारी परिसर १, सृष्टी अपार्टमेंट १, नाथनगर १, पेशवेनगर १, खोडेगाव, स्वराज विद्यालय १, मनपा शाळा, बन्सीलालनगर १, एन-६ सिडको २, मीरानगर १, बेगमपुरा १, बन्सीलालनगर १, वेदांतनगर १, गारखेडा परिसर २, रेणुका माता मंदिर बीड बायपास परिसर १, तर अन्य ७५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.