जिल्ह्यात ७७ हजार थकबाकीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:11 AM2017-07-21T00:11:59+5:302017-07-21T00:18:24+5:30

हिंगोली : जिल्ह्यात विविध बँकातील एकूण ७७ हजार सभासद थकबाकीदार असल्याने यातील कोणत्या सभासदाचे कर्ज माफ होईल हे आताच सांगणे कठीण आहे.

77 thousand takers in the district | जिल्ह्यात ७७ हजार थकबाकीदार

जिल्ह्यात ७७ हजार थकबाकीदार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात विविध बँकातील एकूण ७७ हजार सभासद थकबाकीदार असल्याने यातील कोणत्या सभासदाचे कर्ज माफ होईल हे आताच सांगणे कठीण आहे. येत्या काही दिवसात शासनस्थरावर नव्यानेच निघणाऱ्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनेनुसान कर्ज माफ करुन नवीन कर्ज दिले जाणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक सुधिर म्हेत्रेवार यांनी सांगितले.
महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी विविध खाद्य वस्तूची मोठ्या प्रमाणात नासाडी केल्यानंतर अखेर २४ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी कर्जमाफी जाहीर केली होती. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांचे दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हिंगोली जिल्ह्यात एकूण ७७ हजार थकबाकीदार असल्याचे समोर आले आहे. कर्जमाफीची प्रक्रिया सुरु असून, थकबाकीच्या याद्या जाहीर झाल्यानंतर व नव्याने काढण्यात येणाऱ्या शासन निर्णयातील सूचनांनुसार सभासदांचे कर्ज माफ करुन त्यांना नवीन कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहे. तसेच २०१२ ते १३, २०१५ ते २०१६ या चार वर्षांत ज्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन झाले आहे, परंतु ३० जून २०१६ रोजी ते थकबाकीदार असतील अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र, ज्यांनी कर्ज मुदतीत फेडले आहे, त्यांना प्रोत्साहन म्हणून पीककर्जाच्या २५ टक्के अथवा २५ हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती दिली जाणार आहे. अजूनही वरिष्ठ स्तरावर कामकाज सुरु असल्याने नेमक्या किती शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल, याचा तपशिल मिळत नाही.

Web Title: 77 thousand takers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.