जायकवाडीत ७७% जलसाठा

By Admin | Published: October 5, 2016 01:01 AM2016-10-05T01:01:55+5:302016-10-05T01:16:29+5:30

पैठण : जायकवाडी धरणात आवक वाढल्याने गेल्या २४ तासांत धरणातील जलसाठ्यात पावणेदोन टीमसीने वाढ झाली आहे. मंगळवारी धरणात १९६५४ क्युसेक क्षमतेने आवक सुरू असून

77% water supply in Jayakwadi | जायकवाडीत ७७% जलसाठा

जायकवाडीत ७७% जलसाठा

googlenewsNext


पैठण : जायकवाडी धरणात आवक वाढल्याने गेल्या २४ तासांत धरणातील जलसाठ्यात पावणेदोन टीमसीने वाढ झाली आहे. मंगळवारी धरणात १९६५४ क्युसेक क्षमतेने आवक सुरू असून, धरणात ७७% जलसाठा झाला असल्याचे धरण नियंत्रण कक्षातून धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले.
नगर जिल्ह्यातील मुळा धरणातून ४३०० क्युसेक व ओझर वेअरमधून ४५७ क्युसेक एवढा विसर्ग प्रवरा नदीत करण्यात येत आहे. देवगड येथील सरिता मापन केंद्रावर प्रवरा नदी ११९४५ क्युसेक क्षमतेने वाहत असल्याचे सहायक अभियंता आर. ई. चक्रे यांनी सांगितले. देवगड येथून हे पाणी अवघ्या १५ मिनिटांत जायकवाडी धरणात दाखल होते.
नाशिक जिल्ह्यातून एकत्रित विसर्ग नांदुर-मधमेश्वर धरणातून ५५९५ क्युसेक क्षमतेने गोदावरी पात्रात करण्यात येत आहे. गोदावरी वैजापूर तालुक्यातील नागमठाण येथील सरिता मापन केंद्रावर ७६०० क्युसेक क्षमतेने वाहत असल्याचे सहायक अभियंता बी. आर. थोरात यांनी सांगितले.
जायकवाडी धरणात मंगळवारी सायंकाळी ७७% जलसाठा झाला होता. १५२२ फूट जलक्षमता असलेल्या धरणाची पाणी पातळी मंगळवारी सायंकाळी ६ वाजता १५१७.३४ फुटापर्यंत पोहोचली होती. धरण पूर्णक्षमतेने भरण्यासाठी आता केवळ ४.६६ फूट पाणीपातळीत वाढ होणे गरजेचे आहे. धरणात एकूण जलसाठा २३९३.४५३ दलघमी (८४.५१ टीएमसी) झाला आहे. यापैकी जिवंत जलसाठा १६५५.३४७ दलघमी ( ५८.४५ टीएमसी ) एवढा झाला आहे . जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणारी धरणे जवळपास १००% भरलेली आहेत. यात करंजवन, दारणा, भंडारदरा, ओझरखेड, मुळा, वाघाड, तीसगाव, कश्यपी, कडवा, बाहुली, वालदेवी, वाकी ही धरणे १००% भरलेली आहेत.

Web Title: 77% water supply in Jayakwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.