८ हजारांचा गुटखा केला जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:55 PM2017-11-12T23:55:48+5:302017-11-12T23:55:59+5:30

शहरालगतच्या खटकाळी बायपास परिसरातून दुचाकीवर गुटखा विक्रीसाठी घेऊन जाणाºयास उपविभागीय अधिकारी राहूल मदणे यांनी पकडले. १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता कारवाई करून गुटखा विक्रेत्याकडील ८ हजार १० रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

8 thousand gurkha seized and seized | ८ हजारांचा गुटखा केला जप्त

८ हजारांचा गुटखा केला जप्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरालगतच्या खटकाळी बायपास परिसरातून दुचाकीवर गुटखा विक्रीसाठी घेऊन जाणाºयास उपविभागीय अधिकारी राहूल मदणे यांनी पकडले. १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता कारवाई करून गुटखा विक्रेत्याकडील ८ हजार १० रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
दुचाकीवरून गुटखा ग्रामीण भागात विक्रीसाठी घेऊन जात असल्याचा पोलिसांना संशय आला. यावेळी उपविभागीय अधिकारी राहूल मदणे यांनी सापळा रचून सदर वाहनचालकास हिंगोली शहरालगतच्या खटकाळी बायपास येथे पकडले. बॅगची झडती घेतली असता विमल व सितार कंपनीचा गुटखा पोलिसांना आढळुन आला. सदर इसमास ताब्यात घेण्यात आले असून परभणी येथील अन्न व औषध विभागाला घटनेची माहिती देण्यात आल्याचे पोलिसांनी दिली.
रविवारी रात्री उशिरापर्यंत आरोपीविरूद्ध गुन्हा दाखलची प्रक्रीया सुरू होती. संबधित विभागाचे अधिकारी आल्यानंतरच गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यास विलंब होऊ शकतो. अशी माहिती हिंगोली शहर पोलिसांनी दिली.

Web Title: 8 thousand gurkha seized and seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.