अकॅडेमिक ऑडिटमध्ये ८० टक्के महाविद्यालये नापास; शासकीय सुविधांपासून राहू शकतात वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2022 12:47 PM2022-03-14T12:47:27+5:302022-03-14T12:49:32+5:30

३६० महाविद्यालयांना सोमवार, दि. १४ मार्च रोजी विद्यापीठात प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली त्रुटींची पूर्तता किंवा म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे.

80% colleges fail in academic audit of Dr.BAMU; May be deprived of government facilities | अकॅडेमिक ऑडिटमध्ये ८० टक्के महाविद्यालये नापास; शासकीय सुविधांपासून राहू शकतात वंचित

अकॅडेमिक ऑडिटमध्ये ८० टक्के महाविद्यालये नापास; शासकीय सुविधांपासून राहू शकतात वंचित

googlenewsNext

औरंगाबाद : विद्यापीठाच्या नवीन कायद्यानुसार महाविद्यालयांना शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षणामध्ये (एज्युकेशन ऑडिट) ‘ए’ ग्रेड मिळणाऱ्या महाविद्यालयांनाच संलग्नीकरण मिळणार आहे. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रातील ४३० महाविद्यालयांपैकी अवघ्या ५० ते ६० महाविद्यालयांनाच ‘ए’ ग्रेड मिळाली असून, उर्वरित ३८० महाविद्यालयांची अडचण वाढली आहे.

एज्युकेशनल ऑडिटसाठी विद्यापीठाने दीड वर्षांपूर्वी महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागितले होते. प्रस्तावाची पडताळणी करण्यासाठी कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी माजी कुलगुरु तसचे माजी प्रकुलगुरु यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हानिहाय ४ समित्या नेमल्या होत्या. मात्र, कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे समित्यांकडून मागील दीड वर्षात ऑडिटचे काम होऊ शकले नव्हते. अलिकडे समित्यांनी प्राप्त प्रस्तावांची पडताळणी केल्यानंतर कार्यक्षेत्रातील चार जिल्ह्यांमध्ये ५० ते ६० महाविद्यालयांनाच ‘ए’ ग्रेड मिळाली आहे. उर्वरित ३८० महाविद्यालयांना ‘बी’, ‘सी’, ‘डी’ आणि ‘नो ग्रेड’ असे शेरे मिळाले आहेत. या ३६० महाविद्यालयांना सोमवार, दि. १४ मार्च रोजी विद्यापीठात प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली त्रुटींची पूर्तता किंवा म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे.

ग्रेड का मिळाली नाही
ग्रेड मिळण्यासाठी महाविद्यालयांचे ‘नॅक’ ॲक्रिडेशन होणे गरजेचे असते. ‘एनआरएफ’मध्ये सहभाग असायला हवा. महाविद्यालयाकडे क्रीडांगण, आधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा, संशोधन, राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग, निकालाची उज्ज्वल परंपरा आदी बाबी कमी असल्यामुळे ऑडिटमध्ये ३६० महाविद्यालये नापास झाली आहेत. त्यांना ‘बी’पासून खालचे ग्रेड मिळाले आहेत.

‘ए’ ग्रेड नाहीत, तर काय होईल
नवीन कायद्यात एज्युकेशनल ऑडिटमध्ये ज्या महाविद्यालयांना ‘ए’ ग्रेड मिळाली नसेल, त्यांना विविध कोर्स किंवा संशोधनासाठी युजीसीकडून अनुदान मिळणार नाही. प्राध्यापकांच्या प्रोजेक्टसाठी निधी मिळणार नाही. विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध फेलोशिप तसेच वेगवेगळ्या स्कॉलरशिप मिळणार नाहीत.

आज जिल्हानिहाय सुनावणी
जिल्हा- महाविद्यालये- वेळ
औरंगाबाद - १६०- स. ११ ते दु. २ वा.
जालना- ७३ - स. ११ ते दु. २ वा.
बीड- ९१ - दु. ३ ते सायं.५ वा.
उस्मानाबाद - ५६- दु. ३ ते सायं. ५ वा.

Web Title: 80% colleges fail in academic audit of Dr.BAMU; May be deprived of government facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.