ग्रामीणमध्ये नव्या रुग्णांत ८० टक्के घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:21 AM2020-12-11T04:21:08+5:302020-12-11T04:21:08+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागात दररोज निदान होणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांत ८० टक्के घट झाली आहे. सप्टेंबर महिन्यात दररोज शंभरांवर ...
औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागात दररोज निदान होणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांत ८० टक्के घट झाली आहे. सप्टेंबर महिन्यात दररोज शंभरांवर रुग्णांचे निदान होत गेले. हा आकडा कधी दीडशे पारही झाला. परंतु, गेल्या काही दिवसांपासून दररोज २० पेक्षा कमी रुग्णांचे ग्रामीण भागात निदान होत आहे.
जिल्ह्यात ग्रामीण भागात सर्वप्रथम २६ एप्रिल रोजी दौलताबाद येथे कोरोनाच्या पहिल्या रुग्णाचे निदान झाले होते. त्यानंतर शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही झपाट्याने कोरोनारुग्णांत वाढ झाली. आजघडीला ग्रामीण भागातील रुग्णसंख्येने १५ हजारांचा आकडा पार केला आहे. ग्रामीण भागात सप्टेंबरमध्ये कोरोना रुग्णांत सर्वाधिक वाढ झाली. रोज १०० ते १५० च्या दरम्यान रुग्णांचे निदान होत गेले. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्ययंत्रणेची मोठी कसरत होत होती. ऑक्टोबरनंतर रुग्णांची संख्या कमी होत गेली. नोव्हेंबरमध्ये त्यात आणखी घट झाली. त्यानंतर आता गेल्या १० दिवसांपासू दररोज १२ ते २० च्या संख्येत कोरोना रुग्णांचे निदान होत आहे.
मृत्यूदर २.२ टक्के
ग्रामीण भागात आतापर्यंत ३३४ रुग्णांचे निदान झाले आहे. ग्रामीण भागातील मृत्यूदर २.२ टक्के एवढा आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाणही कमी आहे.