८० गोण्या तांदूळ, २६ गोण्या गहू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:05 AM2021-02-24T04:05:27+5:302021-02-24T04:05:27+5:30
लासूर स्टेशन : रेशनचा तांदूळ व गहू अहमदनगर येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या टेम्पोला लासूर स्टेशन कृ.उ.बा. ...
लासूर स्टेशन : रेशनचा तांदूळ व गहू अहमदनगर येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या टेम्पोला लासूर स्टेशन कृ.उ.बा. समितीसमोर शिल्लेगाव पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत टेम्पोतील ८० गोण्या तांदूळ, २६ गव्हाच्या गोण्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
शिल्लेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथून रेशनचा तांदूळ व गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याची माहिती शिल्लेगाव पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली. त्यानुसार शिल्लेगाव पोलिसांनी मंगळवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास लासूर स्टेशन येथील बाजार समितीसमोर सापळा रचला. बाजार समिती समोरून अहमदनगरकडे जात असलेल्या टेम्पो (क्रमांक. एम.एच. १५, बी. जे. ३२४५) ला पोलिसांनी अडविले. चालक अक्षय सुखदेव मोगल (रा. साकेगाव, ता. वैजापूर) याची चौकशी केली. चालक अक्षय याच्या सांगण्यावरून किसनलाल कोठारी (रा. बोलठाण, ता.नांदगाव, जि. नाशिक) यांचा माल आहे, अशी कबुली दिली. या टेम्पोत ८० गोण्या तांदूळ, २६ गोण्यासह टेम्पो शिल्लेगाव पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आला आहे. गंगापूर तहसील कार्यालयाला शिल्लेगाव पोलिसांनी माहिती दिली आहे. तहसील विभागाचे अधिकारी आल्यावर पंचनामा केला जाईल. ही कारवाई शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक अमोल ढाकणे, पोलीस नाईक मनोज औटे यांनी केली.