लोकअदालतीत ८१ प्रकरणे निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 12:41 AM2017-09-13T00:41:50+5:302017-09-13T00:41:50+5:30
दुरावलेले संबंध व प्रलंबित असलेले तसेच दाखलपूर्व प्रकरणे सामंजस्याने मिटवून घेण्याकरिता ९ सप्टेंबर रोजी हिंगोली जिल्हा न्यायालयात राष्टÑीय लोक अदालतीमध्ये एकूण ३१८ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ८१ प्रकरणे निकाली लागली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : दुरावलेले संबंध व प्रलंबित असलेले तसेच दाखलपूर्व प्रकरणे सामंजस्याने मिटवून घेण्याकरिता ९ सप्टेंबर रोजी हिंगोली जिल्हा न्यायालयात राष्टÑीय लोक अदालतीमध्ये एकूण ३१८ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ८१ प्रकरणे निकाली लागली आहेत. सदर प्रकरणांत १ कोटी ४९ लाख २९ हजार ८०० रूपये वसूल करण्यात आले. मोटार अपघातातील प्रकरणांची रक्कम संबधित इन्शुरन्स कंपनीकडून तर बँकचे वादपूर्वची रक्कम संबधित व्यक्तींकडून वसूल केली आहे.
राज्यातील उच्च न्यायालय व खंडपीठे तसेच जिल्हा, तालुका, कौटुंबिक न्यायालये, इतर न्यायालये-न्यायधिकरणे येथे राष्टÑीय विधीकरण सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये ९ सप्टेंबर रोजी राष्टÑीय लोकअदालत भरविण्यात आली होते. लोक अदालतीमध्ये धनादेश अनादराची प्रकरणे ८५ ठेवण्यात आले होते. त्यापैकी ७ निकाली लागली असून यामध्ये ३४ लाख रूपये वसूल करण्यात आले. तर मोटार अपघाताची ९८ पैकी ६८ प्रकरणे निकाली लागले. यामध्ये १ कोटी १३ लाख ५४ हजार ८०० रूपये वसूल झाले. विद्युत चोरीच्या दोनपैकी एक प्रकरण निकाली लागले असून २५ हजार वसूल केले. कौटुंबिक विवादाची १४ पैकी २ प्रकरणे निकाली लागली आहेत. दीड लाख रूपये वसूल केले. दिवाणी स्वरूपाची १८ पैकी ३ प्रकरणे निकाली लागली. तर फौजदारी ९, भूसंपादनाची ६ प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवली होती.