रोहयो कामांवर वर्षभरात ८३ कोटींचा खर्च

By Admin | Published: February 24, 2016 11:55 PM2016-02-24T23:55:24+5:302016-02-24T23:57:45+5:30

परभणी : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत २०१५-१६ या आर्थिक वर्षात आतापर्यंत १४ हजार ८४१ कामांवर ८३ कोटी ५७ लाख २६ हजार रुपयांचा खर्च झाला आहे़

83 crore spent on ROHO works | रोहयो कामांवर वर्षभरात ८३ कोटींचा खर्च

रोहयो कामांवर वर्षभरात ८३ कोटींचा खर्च

googlenewsNext

परभणी : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत २०१५-१६ या आर्थिक वर्षात आतापर्यंत १४ हजार ८४१ कामांवर ८३ कोटी ५७ लाख २६ हजार रुपयांचा खर्च झाला आहे़ यामध्ये सर्वाधिक म्हणजे ७ हजार २९२ कामे सिंचनाशी संबंधित करण्यात आली आहेत़
परभणी जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची (नरेगा) मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत़ यासंदर्भात नरेगाच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात २०१५-१६ या आर्थिक वर्षात एकूण १४ हजार ८४१ कामे करण्यात आली आहेत़ त्यामध्ये मजुरांवर ५१ कोटी ४८ लाख २५ हजार रुपयांचा तर मशीनद्वारे करण्यात आलेल्या कामांवर ३२ कोटी ९ लाख १ हजार रुपयांचा खर्च करण्यात आलेला आहे़ यामध्ये पाणीपुरवठ्याची १ हजार ९०४ कामे करण्यात आली आहेत़ त्यासाठी मजुरांवर ५ कोटी २४ लाख ९३ हजार तर मशीनद्वारे करण्यात आलेल्या कामांवर १ कोटी ११ लाख ६५ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला आहे़
यामध्ये सर्वाधिक म्हणजे ७६६ कामे जिंतूर तालुक्यात करण्यात आली असून, या तालुक्यात २ कोटी ८३ लाख रुपये या कामांवर खर्च करण्यात आले आहेत़ सर्वात कमी कामे मानवत तालुक्यात करण्यात आली असून, या तालुक्यात ४८ कामांवर ८ लाख ४९ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत़
जिल्ह्यात ५८७ रस्त्यांच्या कामांवर १० कोटी ३० लाख १८ हजार रुपये खर्च करण्यात आले असून, मशीनद्वारे करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांवर ५ कोटी ९५ लाख ८८ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत़
त्यामध्ये जिंतूर तालुक्यात सर्वाधिक म्हणजे २६८ कामे करण्यात आली असून, या कामांवर एकूण ५ कोटी ४७ लाख ११ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला आहे़ विशेष म्हणजे जिल्ह्यातील ९ तालुक्यांपैकी परभणी तालुक्यात रस्त्याचे सर्वात कमी म्हणजे ६ कामे करण्यात आली आहेत़
याशिवाय पिण्याच्या पाण्याचे बळकटीकरण करण्याचे जिल्ह्यात १९ कामे करण्यात आली असून, या कामांवर १ लाख ४५ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत़ विशेष म्हणजे केवळ परभणी तालुक्यातच हा खर्च करण्यात आला आहे़ अन्य आठही तालुक्यांत या कामांवर खर्च करण्यात आलेला नाही़ दुष्काळ निवारणाच्या अनुषंगाने जिल्ह्यात १८८५ कामांवर एकूण २ कोटी १३ लाख ४१ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत़ त्यामध्येही जिंतूर तालुका आघाडीवरच आहे़
या अंतर्गत सर्वात कमी म्हणजे ५ कामे सोनपेठ तालुक्यात करण्यात आली आहेत़ परंतु, या कामांवरचा खर्च प्रशासनाने वेबसाईटवर दिलेला नाही़ जमिनीचा विकास करण्याचे जिल्ह्यात ४७ कामे करण्यात आली असून, त्यावर ४२ लाख २ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत़ जिल्ह्यात इतर ३१ कामे करण्यात आली असून, त्यावरचाही खर्च वेबसाईटवर देण्यात आलेला नाही़ (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: 83 crore spent on ROHO works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.