व्यवसायासाठी जिल्हा उद्याेग केंद्राकडून २८५ जणांना ८ कोटी ३७ लाखांचे अनुदान 

By बापू सोळुंके | Published: August 18, 2023 08:22 PM2023-08-18T20:22:34+5:302023-08-18T20:22:46+5:30

कर्जवाटप झाल्यानंतर तीन वर्षांनी जिल्हा उद्योग केंद्राकडून लाभार्थ्याच्या कर्ज खात्यात अनुदानाची ही रक्कम अदा करण्यात येते

8.37 lakhs subsidy to 285 people from District Industry Center for business | व्यवसायासाठी जिल्हा उद्याेग केंद्राकडून २८५ जणांना ८ कोटी ३७ लाखांचे अनुदान 

व्यवसायासाठी जिल्हा उद्याेग केंद्राकडून २८५ जणांना ८ कोटी ३७ लाखांचे अनुदान 

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा उद्याेग केंद्राकडून २८५ व्यावसायिक, उद्योजकांना सुमारे ८ कोटी ३७ लाख ८३ हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सुशिक्षित बेरोजगारांना उद्याेग, व्यवसाय करण्यासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. 

बँकेमार्फत वाटप झालेल्या या कर्जावर शहरी भागासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याला १५ टक्के, तर ग्रामीण भागातील लाभार्थ्याला २५ टक्के आणि अनुसूचित जाती, जमातीच्या अर्जदार, महिला आणि अपंगांना २५ ते ३५ टक्के अनुदान देण्यात येते. कर्जवाटप झाल्यानंतर तीन वर्षांनी जिल्हा उद्योग केंद्राकडून लाभार्थ्याच्या कर्ज खात्यात अनुदानाची ही रक्कम अदा करण्यात येते, असे केंद्राच्या सूत्रांनी सांगितले.

सन..........कर्जदारांची संख्या रक्कम
२०२०-२१ ............५५........ १ कोटी ८७ लाख ९७ हजार
२०२१-२२...........९४..........३ कोटी ६३ लाख ३ हजार
२०२२-२३............. १३३............ २ कोटी ८५ लाख ८३ हजार

जिल्ह्यात मंजूर झालेल्या कर्जदारांची संख्या
१ लाखापर्यंत मंजूर कर्ज संख्या - ३२
१ ते २ लाखांपर्यंत मंजूर कर्ज - ६५
२ ते ५ लाखांपर्यंत मंजूर कर्ज - १३३
५ ते १० लाखांपर्यंत मंजूर कर्ज - २०९
१० ते १५ लाखांपर्यंत मंजूर कर्ज - ११
१५ ते २५ लाखांपर्यंत मंजूर कर्ज - ३७
२५ ते ५० लाखांपर्यंत मंजूर कर्ज - १६

Web Title: 8.37 lakhs subsidy to 285 people from District Industry Center for business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.