८७ % नागरिकांना ‘आधार’

By Admin | Published: January 15, 2017 01:14 AM2017-01-15T01:14:19+5:302017-01-15T01:14:50+5:30

जालना ८७ टक्के नागरीकांनी आधार कार्ड काढले असल्याची माहिती सुत्रानी दिली.

87% citizens 'base' | ८७ % नागरिकांना ‘आधार’

८७ % नागरिकांना ‘आधार’

googlenewsNext

गंगाराम आढाव जालना
जिल्ह्याची लोकसंख्या १६ लाख ५ हजार ४३४ असून त्यापैकी १४ लाख ३ हजार ४०७ नागरीकांनी म्हणजे ८७ टक्के नागरीकांनी आधार कार्ड काढले असल्याची माहिती सुत्रानी दिली.
केंद्र सरकारने संपूर्ण देशभर नागरीकांना एक ओळख पत्र देण्यासाठी आधार कार्ड ओळखपत्र वितरित करण्याचा निर्णय गेल्या दोन वर्षापूर्वी घेतला होता. त्यानुसार जालना जिल्ह्यातील ८७ टक्के नागरीकांनी आतापर्यंत आधार कार्ड काढून घेतले आहे. जिल्ह्याची लोकसंख्या १६ लाख ५ हजार ४३४ आहेत. त्यापैकी १४ लाख ४ हजार ४०७ नागरीकांनी आधारकार्ड काढलेले आहेत. त्यात जालना तालुक्याची लोकसंख्या ३ लाख८५ हजार ८६० पैकी ३ लाख २९ हजार ८६३ म्हणजे ८४ टक्के, बदनापूर १ लाख ३६ हजार ३९८ पैकी १ लाख १० हजार ८७६ म्हणजे ८४.६० टक्के, भोकरदन २ लाख ४६ हजार२९९ पैकी २ लाख १७ हजार १८१ नागरीकांनी आधार कार्ड काढले आहेत. तसेच जाफराबाद तालुक्यातील १ लाख ४७ हजार ९ पैकी १ लाख २६ हजार५९८ , परतूर तालुक्यातील १ लाख ६१ हजार ४४४ पैकी १ लाख ४८ हजार २१६, मंठा १ लाख ६० हजार ३५९ पैकी १ लाख४५ हजार७४९, अंबड तालुक्यातील २ लाख ८५१ पैकी १ लाख ८१ हजार ९०१, घनसावंगी तालुक्यात १ लाख ७१ हजार १९६ पैकी १ लाख ४६ हजार १७९ नागरीकांनी आधार कार्ड काढलेले आहेत.

Web Title: 87% citizens 'base'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.