केंद्रप्रमुखांची ८९, मुख्याध्यापकांची ९८ पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:05 AM2021-07-31T04:05:26+5:302021-07-31T04:05:26+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या उपक्रमशील शिक्षक लोकसहभागातून शाळांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, शाळांवर अपूर्ण शिक्षक, शाळांना ...
औरंगाबाद : जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या उपक्रमशील शिक्षक लोकसहभागातून शाळांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, शाळांवर अपूर्ण शिक्षक, शाळांना नियंत्रित करणाऱ्या पदांची संख्या अपुरी असल्याने त्याचा प्रभारी बोजा तेथील शिक्षकांवर येत आहे. परिणामी शाळेच्या कामकाजावर परिणाम होत आहे. त्यामुळे केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांची रिक्त पदे भरण्याची मागणी प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या २१३१ प्राथमिक शाळा आहेत. त्यात ८९ केंद्रप्रमुखांची, तर मुख्याध्यापकांची ९८ पदे रिक्त आहेत.
केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक ही सनियंत्रण करणारी पदे आहेत. ही पदे रिक्त असायला नको. गुणवत्ता वाढीसाठी ही पदे भरणे गरजेचे आहे. कारण शाळेतील एका सह शिक्षकाला प्रभारी मुख्याध्यापक पदाचा कार्यभार सांभाळावा लागतो. परिणामी त्या शिक्षकाकडे असलेल्या वर्गातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होते. शेवटी गुणवत्ता ढासळली म्हणून शिक्षकांना जबाबदार धरले जाते. त्यामुळे रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज असल्याची मागणी प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस कैलास गायकवाड यांनी केली आहे.
----
प्राथमिक शाळांतील महत्त्वाची पदे
---
पद - मंजूर -कार्यरत -रिक्त
केंद्रप्रमुख -१२८ -३९ -८९ मुख्याध्यापक -५६४ -४६६ -९८
---