९६ लाख २२ हजारांची वसुली रखडली

By Admin | Published: July 19, 2015 12:44 AM2015-07-19T00:44:51+5:302015-07-19T00:58:54+5:30

लातूर : महाराष्ट्र शासनाने ग्रामपातळीवर कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्हावा, यासाठी लातूर जिल्ह्यातील ६८ गावात जलस्वराज पाणीपुरवठा योजना राबविली होती़

9 6 lakh 22 thousand rupees have been recovered | ९६ लाख २२ हजारांची वसुली रखडली

९६ लाख २२ हजारांची वसुली रखडली

googlenewsNext


 

लातूर : महाराष्ट्र शासनाने ग्रामपातळीवर कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्हावा, यासाठी लातूर जिल्ह्यातील ६८ गावात जलस्वराज पाणीपुरवठा योजना राबविली होती़ या योजनेत गाव समितीच्या अध्यक्ष, सचिवांनी कामे न करताच निधी उचलला़ परिणामी, १ कोटी ३६ लाख ८ हजार २७० रुपयाची वसुली मोहीम प्रशासनाने सुरु केली आहे़ शिवाय, अध्यक्ष, सचिव असलेल्या ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, ४१ लाख ६२ हजार ४७७ रुपयांचा बोजा त्यांच्या सातबाऱ्यावर लावण्यात आला आहे़ ५९ गावांतील अध्यक्ष सचिवांना ९६ लाख २२ हजार १४३ रुपयांच्या वसुलीबाबत नोटिसा पाठविण्यात आल्या़ मात्र वसुली नसल्याचे समोर आले आहे़
लातूर तालुक्यातील हरंगुळ (बु़) ६२ हजार १५४, धनेगाव ६० हजार १६२, करकट्टा ११ हजार ४९५, औसा तालुक्यातील एकंबी १ लाख ७० हजार ६०७, शिवणी (बु़) १ लाख ३५ हजार ४९८, वाघोली ५३ हजार ५४५, हसाळा २१ हजार ३५५, भंगेवाडी ५३ हजार ३७६, बिरवली १ लाख १४ हजार ३९२, निलंगा तालुक्यातील बुजरूगवाडी १ लाख ७८ हजार ५० रूपये, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सांगवी (घु़) ९१ हजार ३९२, भिंगोली २ लाख ९२ हजार ८२ रूपये, हालकी ३ लाख १६ हजार ४१७ रूपये, आनंदवाडी १ लाख ३० हजार ५९६, वेबनाळ १ लाख १४ हजार ५५४ रूपये, लक्कड जवळगा १ लाख ६२ हजार २१३, अंकुलगा (स़) २० हजार ४०० रूपये, दैठणा ८४ हजार ७९० रूपये.
जळकोट तालुक्यातील मेवापूर ९५ हजार ११९, जगळपूर ६१ हजार ४२०, विराळ ९४ हजार १४२, लाळी (खु़) १ लाख ४९ हजार ३२८, गुत्ती ४३ हजार ९०८, गुत्तीतांडा ९ हजार ६४, गव्हाण ४५ हजार ९५१, जिरगा १ लाख ७२ हजार ५१०, हावरगा-डोमगाव ७ लाख ९४ हजार ७५६, उदगीर तालुक्यातील शंभू उमरगा ११ लाख ७० हजार ७०३, अवलकोंडा २ लाख १० हजार ७८७, गंगापुर १ लाख १५१, चौंडी २२ हजार ९९६, नागलगाव (ता़) ५ लाख ७३ हजार ५४६, बनशेळकी १ लाख ४९ हजार ४३१, आडोळवाडी ३ हजार ३५२, इस्लामपूर १५ हजार ७७१़
अहमदपूर तालुक्यातील परचंडा ४ लाख ५७ हजार ३०१, तळेगाव १ लाख ७० हजार ७३१ व्यस्तापूर १ लाख ७२ हजार ९५३, तांबटसांगवी ९४ हजार ६८४, नागझरी ३ लाख ७५ हजार ९४़ चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ ४ लाख ८ हजार ६०८, घारोळा १ लाख ३२ हजार ८४, महाळंग्रा १ लाख ७२ हजार ७५३़ रेणापूर तालुक्यातील वांगदरी १ लाख ५८ हजार ५४, पोहरेगाव २ लाख ५७ हजार ९२७, सारोळा ७२ हजार २०४, सय्यदपूर २५ हजार ६०६, हारवाडी ३ लाख ९ हजार ४८८ व पळशी अशा एकूण ९६ लाख २२ हजार ७९३ रुपयाची वसुली होणे बाकी आहे़ (प्रतिनिधी)
जलस्वराज आंतर्गत शासनाने दिलेला कोट्यावधीचा निधी खर्चुनही या गावामध्ये परिपूर्णपणे पाणीपुरवठा यशस्वी झालेला नाही़ परिणामी या गावात जिल्हा प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे़ जलस्वराज्याची कामे झालेल्या गावात पुन्हा पाणीपुरवठ्याची कामे नाहीत, असे आदेश असतानाही टंचाईमुळे टँकर देण्यात आले आहे़

Web Title: 9 6 lakh 22 thousand rupees have been recovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.