स्मार्ट सिटीच्या ९ बसेस मनपाला, २ जिल्हा प्रशासनाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:03 AM2021-03-17T04:03:27+5:302021-03-17T04:03:27+5:30
मागील वर्षीच्या तुलनेत कोरोनाची दुसरी लाट आता आली. वाहतुकीसाठी महापालिकेला ९ तर जिल्हा प्रशासनाला २ बस देण्यात आल्या आहेत. ...
मागील वर्षीच्या तुलनेत कोरोनाची दुसरी लाट आता आली. वाहतुकीसाठी महापालिकेला ९ तर जिल्हा प्रशासनाला २ बस देण्यात आल्या आहेत.
लॉकडाऊन संपल्यानंतर औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट काॅर्पोरेशनच्या वाहतूक विभागाने शहर बस रस्त्यावर उतरविल्या होत्या. पण दुसऱ्या लाटेत पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या विक्रमी वाढत आहे. १०० पासून सुरू झालेली रुग्णसंख्या हजारांच्या पुढे जाऊन ठेपली आहे. दररोज भरती होणारे रुग्ण रिक्षातून किंवा दुचाकीद्वारे कोविड केअर सेंटरमध्ये जात आहेत. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने महापालिकेस ९ बस दिल्या आहेत. जिल्हा प्रशासनाला दोन बस दिल्याचे वाहतूक विभागाचे प्रमुख प्रशांत भुसारी यांनी सांगितले.
४२ हजार ३५० रुपये दंड वसूल
औरंगाबाद : महापालिकेच्या नागरी मित्र पथकाने १५ मार्च रोजी शहरात ४२ हजार ३५० रुपये दंड वसूल केला. मास्क न घालणाऱ्या ५४ नागरिकांकडून २७ हजार रुपये दंड वसूल केला. चेलीपुरा, अंगुरीबाग येथे प्रतिबंधित कॅरीबॅगचा वापर करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला.
रेल्वेस्टेशन, विमानतळावर ६ पॉझिटिव्ह
औरंगाबाद : महापालिकेच्या आरोग्य विभागाने मंगळवारी रेल्वे स्टेशन आणि विमानतळावर १९१ प्रवाशांची कोरोना तपासणी केली. सोमवारी ज्या प्रवाशांची तपासणी केली होती त्यातील सहाजण मंगळवारी पॉझिटिव्ह आढळून आले.