९ आरोग्य केंद्र, ४३ उपकेंद्र निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 12:51 AM2017-09-14T00:51:27+5:302017-09-14T00:51:27+5:30

जिल्ह्यातील ९ ठिकाणी आरोग्य केंद्र व ४३ ठिकाणी उपकेंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव बुधवारी झालेल्या आरोग्य समितीच्या बैठकीत मंजूर करून तो शासनाकडे पाठविण्यावर शिक्कामोर्तब झाले. तसेच सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये अधिकारी व कर्मचाºयांची नियमित उपस्थित रहावी, याकरीता बायोमॅट्रिक प्रणाली बसून त्या आधारेच संबंधितांचे दरमहा पगार करण्याचा निर्णय घेण्यात आला़

9 Health Centers, 43 Government proposals for sub-station creation | ९ आरोग्य केंद्र, ४३ उपकेंद्र निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे

९ आरोग्य केंद्र, ४३ उपकेंद्र निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील ९ ठिकाणी आरोग्य केंद्र व ४३ ठिकाणी उपकेंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव बुधवारी झालेल्या आरोग्य समितीच्या बैठकीत मंजूर करून तो शासनाकडे पाठविण्यावर शिक्कामोर्तब झाले. तसेच सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये अधिकारी व कर्मचाºयांची नियमित उपस्थित रहावी, याकरीता बायोमॅट्रिक प्रणाली बसून त्या आधारेच संबंधितांचे दरमहा पगार करण्याचा निर्णय घेण्यात आला़
जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती तथा जि़प़ उपाध्यक्ष भावनाताई नखाते यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य समितीची बुधवारी दुपारी २़३० च्या सुमारास जि़प़मध्ये बैठक घेण्यात आली़ याबैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली़
त्यामध्ये सर्व आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती कायम रहावी, यासाठी बायोमॅट्रिक प्रणाली बसविण्याचा निर्णय घेण्यात आला़
यासाठीचा निधी संबंधित आरोग्य केंद्रांनी त्यांच्या रुग्ण कल्याण समितीच्या निधीतून भागवावा, असेही निश्चित करण्यात आल़े जिल्ह्यात रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकाºयांच्या २२ जागा भरण्याची प्रक्रिया राज्य पातळीवरून सुरू झाली असल्याची माहिती यावेळी सदस्यांना देण्यात आली़
तसेच जिल्ह्यातील लोहगाव, पोखर्णी, रवळगाव, केकरजवळा, बामणी, पेठशिवणी, उखळी, बोर्डा, हरंगुळ या ९ गावांच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र तर इतर ४३ ठिकाणी आरोग्य उपकेंद्र उभारण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला़ २०११ च्या जनगणनेच्या आधारे ३० हजार लोकसंख्येसाठी १ आरोग्य केंद्र तर ५ हजार लोकसंख्येसाठी १ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला़ या त्यानुसार या गावांची निवड करण्यात आली़
यावेळी प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ खंदारे, समितीचे सदस्य श्रीनिवास जोगदंड, भगवान सानप आदींची उपस्थिती होती़

Web Title: 9 Health Centers, 43 Government proposals for sub-station creation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.