मराठवाड्यातील ९ लाख शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत; सरकार कधी निर्णय घेणार?
By विकास राऊत | Published: January 25, 2024 01:31 PM2024-01-25T13:31:38+5:302024-01-25T13:32:50+5:30
विभागीय आयुक्तालयाने शासनाला निधी मागणीचा प्रस्ताव दिला असून, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरसह विभागातील आठ जिल्ह्यांतील ४ लाख ९४ हजार ९१८.३० हेक्टरवरील कापसासह रबी पिके, फळबागांना गेल्या महिन्यातील अवकाळी पावसाचा फटका बसला. यामुळे ९ लाख ६७ हजार ५६१ शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या शेतकऱ्यांना ७०९ कोटी ९२ लाख ४१ हजार रुपयांचा मदतनिधी लागणार आहे.
विभागीय आयुक्तालयाने शासनाला निधी मागणीचा प्रस्ताव दिला असून, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. २०२२ मध्ये अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाले, तर गेल्या हंगामात दीड महिना पावसाचा खंड राहिल्याने खरीप हातून गेले. पुढे रब्बी हंगामात २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२३ दरम्यान विभागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. मराठवाड्यातील ४ लाख ७६ हजार ७७८.९८ हेक्टर जिरायत क्षेत्रावरील पिकांचे नुकसान अवकाळी पावसाने केले. ४ हजार २१८.७५ हेक्टरवरील बागायत क्षेत्राला, तसेच १३ हजार ९२०.५७ हेक्टवरील फळपिकांना फटका बसला.
जिल्हानिहाय बाधित शेतकरी व अपेक्षित निधी
जिल्हा............ बाधित शेतकरी संख्या..... एकूण बाधित क्षेत्र......अपेक्षित निधी
छत्रपती संभाजीनगर ..... २६४१९४ ...... १४८३६८.४१ ...... २०६००.५८
जालना ....... २०७२१६ ...... १२३०९१.८७ ....... १९१७६.९३
परभणी ....... २३१७८७ ....... ९५०५३.६७ ....... १३०८०.५९
हिंगोली ...... २५७६२५ ....... १२३१६४.४० ...... १६७८६.६५
नांदेड ..... ३९२२ ...... ३७५८.५० ....... ८८०.२६
लातूर ..... ८८८ ......२६२.८९ ...... ३५.९१
बीड ...... १७ ...... ९.९० ...... २.१९
धाराशिव ...... १९१२ ..... १२०८. ६६ ....... ४२९.३०
एकूण ..... ९६७५६१ ..... ४९४९१८.३० ....... ७०९९२.४१