९ लाख मेट्रिक टन चाऱ्याची भासणार तूट
By Admin | Published: January 14, 2015 11:28 PM2015-01-14T23:28:31+5:302015-01-15T00:11:42+5:30
बीड : दुष्काळी स्थितीमुळे गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट बनला आहे. या काळात सुमारे ९ लाख मेट्रिक टन चाऱ्याची टंचाई जाणवणार आहे. त्यामुळे पशुपालकांसोबत प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे.
बीड : दुष्काळी स्थितीमुळे गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट बनला आहे. या काळात सुमारे ९ लाख मेट्रिक टन चाऱ्याची टंचाई जाणवणार आहे. त्यामुळे पशुपालकांसोबत प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे.
जिल्ह्यात १२ लाख ३६ हजार ९९३ इतकी गुरे आहेत. ६ लाख ६८ हजार २६८ मोठ्या, एक लाख ५७ हजार १६६ छोट्या गुरांचा समावेश आहे. शिवाय ४ लाख ११ हजार ५५९ इतक्या शेळ्या- मेंढ्या आहेत. यावर्षी एकूण ३ लाख ६५ हजार ९३३ मे. टन इतक्या चाऱ्याचे उत्पन्न झाले. ४ हजार ४०० मे.टन इतक्या चाऱ्याची रोज आवश्यकता भासते. सध्या खरीप हंगामातील २ लाख १९ हजार ११९ हजार मे. टन चारा उपलब्ध आहे. रबी हंगामात १ लाख ७१ हजार ४६९ मे. टन इतक्या चाऱ्याचे उत्पन्न होऊ शकते.
येणाऱ्या काळात ८ लाख ८५ हजार ८९२ मे. टन इतक्या चाऱ्याची टंचाई भासू शकते.
दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी उपाय सुरु आहेत, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. के. तुंबारे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)