ओबीसीतून ९ टक्के आरक्षण... राठोडांचा फॉर्म्युला मनोज जरांगेंना अमान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 05:30 AM2023-12-26T05:30:05+5:302023-12-26T05:32:23+5:30

जरांगे-पाटील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. राठोड यांनी त्यांची भेट घेतली.

9 percent reservation from obc haribhau rathod formula rejects manoj jarange | ओबीसीतून ९ टक्के आरक्षण... राठोडांचा फॉर्म्युला मनोज जरांगेंना अमान्य

ओबीसीतून ९ टक्के आरक्षण... राठोडांचा फॉर्म्युला मनोज जरांगेंना अमान्य

लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर ( Marathi News ): मराठा समाजाला ओबीसीमध्ये ९ टक्के आरक्षण देण्याचा ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी सांगितलेला फॉर्म्युला मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी अमान्य केला.   

जरांगे-पाटील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. राठोड यांनी सोमवारी त्यांची भेट घेतली. त्यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, या मागणीप्रमाणे आरक्षण  देता येते. यासाठी  मराठा ९ टक्के, भटके, विमुक्त ९ टक्के आणि बारा बलुतेदार ९ टक्के  फॉर्म्युल्याचा वापर करावा लागेल, असे राठोड म्हणाले. मराठा समाजाची लोकसंख्या ४० टक्के आहे, तेव्हा लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळायला हवे, असे जरांगे-पाटील म्हणाले.  ९ टक्के आरक्षण कसे पुरेल, असा सवाल त्यांनी केला. तेव्हा मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्यायचे असेल तर २७ टक्के ओबीसी मर्यादा वाढविण्यासाठी लढावे लागेल, असे राठोड म्हणाले.
 

Web Title: 9 percent reservation from obc haribhau rathod formula rejects manoj jarange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.