ओबीसी आरक्षणाची फोड, मराठ्यांना 'इतके' टक्के; हरिभाऊ राठोडांचा फॉर्म्युला जरांगेंना अमान्य

By बापू सोळुंके | Published: December 26, 2023 11:20 AM2023-12-26T11:20:22+5:302023-12-26T11:25:02+5:30

ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी सोमवारी रुग्णालयात जाऊन जरांगे-पाटील यांची भेट घेतली.

'9 percent reservation in OBCs'; Haribhau Rathore's formula is unacceptable to Manoj Jarange | ओबीसी आरक्षणाची फोड, मराठ्यांना 'इतके' टक्के; हरिभाऊ राठोडांचा फॉर्म्युला जरांगेंना अमान्य

ओबीसी आरक्षणाची फोड, मराठ्यांना 'इतके' टक्के; हरिभाऊ राठोडांचा फॉर्म्युला जरांगेंना अमान्य

छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण द्यावे, जरांगे-पाटलांच्या मागणीप्रमाणे मराठा समाजाला ओबीसीमध्ये ९ टक्के आरक्षण देण्याचा ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी सांगितलेला फॉर्म्युला मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी अमान्य केला.

ते म्हणाले, या फॉर्म्युल्यामुळे अर्ध्या मराठा समाजालाच आरक्षण मिळेल, मग अर्ध्यांना मी अंगावर घेऊ का, असा सवालही त्यांनी केला. प्रकृती बरी नसल्याने मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी सोमवारी रुग्णालयात जाऊन जरांगे-पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, या मागणीप्रमाणे आरक्षण देता येते. यासाठी मराठा समाजाला ९ टक्के, भटके, विमुक्त समाजासाठी ९ टक्के आणि बारा बलुतेदार समाजाला ९ टक्के फॉर्म्युल्याचा वापर करावा लागेल, असे राठोड म्हणाले. 

राठोड यांचा फॉर्म्युला मात्र जरांगे-पाटील यांनी अमान्य केला. मराठा समाजाची लोकसंख्या ४० टक्के आहे, तेव्हा लोकसंख्येच्या प्रमाणात मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे, असे जरांगे-पाटील म्हणाले. ९ टक्के आरक्षण कसे पुरेल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तेव्हा मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्यायचे असेल तर सर्वप्रथम सर्वांनी मिळून २७ टक्के असलेल्या ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढविण्यासाठी लढावे लागेल, असे राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Web Title: '9 percent reservation in OBCs'; Haribhau Rathore's formula is unacceptable to Manoj Jarange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.