मकबरा परिसरातील ९ अनधिकृत दुकाने जमीनदोस्त; महापालिकेने केली एक वर्षानंतर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 07:24 PM2021-01-05T19:24:13+5:302021-01-05T19:27:29+5:30

जिल्हाधिकारी कार्यालय व पुरातत्व विभागाचे अधिक्षक पुरातत्व यांनी महापालिकेला १४ डिसेंबर २०१९ रोजी जयराज कमलाकर पांडे यांनी केलेले अतिक्रमण व अनाधिकृत बांधकामावर कार्यवाही करण्यासंदर्भात कळविले होते.

9 unauthorized shops in the Bibi-ka-maquabara area demolished; Aurangabad Municipal Corporation took action after one year | मकबरा परिसरातील ९ अनधिकृत दुकाने जमीनदोस्त; महापालिकेने केली एक वर्षानंतर कारवाई

मकबरा परिसरातील ९ अनधिकृत दुकाने जमीनदोस्त; महापालिकेने केली एक वर्षानंतर कारवाई

googlenewsNext

औरंगाबाद : ऐतिहासिक बीबी-का-मकबरा परिसरात अनाधिकृतपणे बांधण्यात आलेल्या ९ दुकानांचे अतिक्रमण आज मंगळवारी मनपाच्या अतिक्रमण हटाव जमीनदोस्त केले. भारतीय पुरातत्व विभागाने वर्षभरापूर्वी महापालिकेला पत्र लिहून कारवाई करण्याची विनंती केली होती.

जिल्हाधिकारी कार्यालय व पुरातत्व विभागाचे अधिक्षक पुरातत्व यांनी महापालिकेला १४ डिसेंबर २०१९ रोजी जयराज कमलाकर पांडे यांनी केलेले अतिक्रमण व अनाधिकृत बांधकामावर कार्यवाही करण्यासंदर्भात कळविले होते. महापालिकेने इतर तक्रारींप्रमाणे या तक्रारीकडेही प्रारंभी दुर्लक्ष केले. भारतीय पुरातत्व विभागाने या संदर्भात पाठपुरावा सुरूच ठेवला. त्यानंतर महापालिकेने कागदी घोडे नाचविण्यात सुरुवात केली. मनपाने अतिक्रमण करणार्‍यांना नोटीस बजावण्याची प्रक्रिया पूर्ण केली. या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम यांनी सोमवार, ४ जानेवारी रोजी जागेची पाहणी करुन कार्यवाही करण्याबाबत आदेशीत केले होते.

त्यानुसार आज मंगळवारी अतिक्रमण हटाव पथकाने बीबी-का-मकबरा परिसरात अनाधिकृतपणे बांधण्यात आलेले ९ दुकानांचे अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. तसेच मुकुंदवाडी भागातील रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारी भाजीमंडईचे अतिक्रमण हटविण्यात आले. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने यापूर्वी किमान दहा वेळेस अशा पद्धतीची कारवाई केली आहे. ही कारवाई पदनिर्देशित अधिकारी सविता सोनवणे, आर.एस. राचतवार, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद, रविंद्र देसाई, पी. बी. गवळी यांच्यासह मनपा अतिक्रमण हटाव पोलीस पथक कर्मचारी यांनी केली. 

Web Title: 9 unauthorized shops in the Bibi-ka-maquabara area demolished; Aurangabad Municipal Corporation took action after one year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.