९० जणांना सुटी, नवे ६६ बाधित, २ मृत्यू

By | Published: November 22, 2020 09:02 AM2020-11-22T09:02:12+5:302020-11-22T09:02:12+5:30

४० हजार ४५८ कोरोनामुक्त : ६५७ रुग्णांवर उपचार सुरू --- औरंगाबाद : दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असताना जिल्ह्यात ...

90 people on leave, 66 new victims, 2 deaths | ९० जणांना सुटी, नवे ६६ बाधित, २ मृत्यू

९० जणांना सुटी, नवे ६६ बाधित, २ मृत्यू

googlenewsNext

४० हजार ४५८ कोरोनामुक्त : ६५७ रुग्णांवर उपचार सुरू

---

औरंगाबाद : दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असताना जिल्ह्यात ६६ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आल्याने काहीसा दिलासा व्यक्त होत आहे. शहरातील दोन वयस्कांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात ९० जणांना उपचार पूर्ण झाल्याने सुटी देण्यात आली. त्यात शहरातील ८०, तर ग्रामीण मधील १० जणांचा समावेश आहे.

आतापर्यंत ४२ हजार २४६ बाधित जिल्ह्यात आढळून आले. त्यापैकी ४० हजार ४५८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आजपर्यंत ११३१ जणांचा मृत्यू झाला असून ६५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. घाटीत भगतसिंगनगर, हर्सूल येथील ७४ वर्षीय पुरुष आणि म्हाडा कॉलनी, उस्मानपुरा येथील ५३ वर्षीय पुरुष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

मनपा हद्दीत ५६ रुग्ण

ज्योतीनगर १, एन-तीन सिडको १, देवळाई रोड १, पडेगाव २, सातारा गाव १, अहिंसानगर १, सावंगी हर्सूल १, सातारा परिसर २, देवगिरी व्हॅली, मिटमिटा १, शीतलनगर, शाहनूरवाडी १, सिंधी कॉलनी १, मिटमिटा १, सृष्टी रेसिडन्सी १, देवगिरी महाविद्यालय परिसर १, त्रिमूर्ती चौक १, वंदे मातरम् माध्यमिक विद्यालय १, टिळकनगर १, सोनामाता विद्यालय १, शिवाजी महाविद्यालय १, एन वन, गरवारे स्टेडिअम परिसर १, तापडिया पार्क १, संसार कॉलनी, पिसादेवी २, एन-सात सिडको १, त्रिवेणीनगर १, एन-आठ २, विशाल पार्क १, हिमायत बाग १, कर्मवीर शंकरसिंह नाईक विद्यालय १, श्रीमती वेणूताई चव्हाण कन्या प्रशाला, सिडको १, पोदार इंटरनॅशनल स्कूल २, जालाननगर १, इटखेडा १, जयभवानीनगर १, आविष्कार कॉलनी १, एन-दोन सिडको १, देवानगर १, जिजामाता सो. १, न्यू हनुमाननगर १, म्हाडा कॉलनी २, प्रतापनगर २, ज्योती प्राईड १, एन तीन सिडको १, शिवाजीनगर १, छावणी परिसर २, भावसिंगपुरा १, नवाबपुरा १, अन्य २, तर ग्रामीण भागात १० रुग्ण आढळून आले. त्यांची नोंद अन्य म्हणून करण्यात आली आहे.

Web Title: 90 people on leave, 66 new victims, 2 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.