बीडमध्ये ९० हजारांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:19 AM2017-10-13T00:19:09+5:302017-10-13T00:19:09+5:30
राहत्या घरात साठवून ठेवलेला ९० हजार रुपयांच्या गुटखा जप्त करून घराची खोली सीलबंद करण्यात आली. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाने गुरुवारी सायंकाळी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : राहत्या घरात साठवून ठेवलेला ९० हजार रुपयांच्या गुटखा जप्त करून घराची खोली सीलबंद करण्यात आली. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाने गुरुवारी सायंकाळी केली. या कारवाईमुळे खळबळ उडाली.
सहायक आयुक्त अभिमन्यू केरूरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी सुलोचना जाधवर यांनी ही कारवाई केली. जाधवर यांना पेठबीड भागातील फिरोज तांबोळी याच्या घरी गुटखा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. जाधवर यांनी खात्री करून तांबोळी याच्या राहत्या घरी गुरुवारी सायंकाळी धाड टाकली. यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा आढळून आला. हा सर्व गुटखा जप्त केल्यानंतर घरातील खोलीही सीलबंद करण्यात आली. या कारवाईत जाधवर यांच्यासह अन्न सुरक्षा अधिकारी अनिकेत भिसे, सचिन खोले, शेख मुक्तार हे सहभागी झाले होते. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद नव्हता.