ऑपरेशन कमांड सेंटरचे ९० टक्के काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:04 AM2021-09-03T04:04:17+5:302021-09-03T04:04:17+5:30
औरंगाबाद : स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या कार्यालयात उभारण्यात येणाऱ्या ऑपरेशन कमांड सेंटरचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. महिनाभरात ...
औरंगाबाद : स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या कार्यालयात उभारण्यात येणाऱ्या ऑपरेशन कमांड सेंटरचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. महिनाभरात उर्वरित काम पूर्ण होईल, असे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले. या कामाची गुरुवारी पांडेय यांनी पाहणी केली. सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्च स्मार्ट सिटी अभिनयाअंतर्गत या सेंटरवर करण्यात आला आहे. उर्वरित काम सप्टेंबरच्या अखेरीस पूर्ण होईल, असा दावा संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी केला. आमखास मैदानाजवळील इमारतीमध्ये स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे कार्यालय होणार आहे. तेथेच मनपाचे ऑपरेशन कमांड सेंटरही सुरू होणार आहे. ऑपरेशन कमांड सेंटरचा वापर घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, ड्रेनेज, रस्ते आदी नागरी सुविधा सुधारणा, बस मार्गांचे नियोजन करण्यासाठी होणार आहे, असे अभियंता फैज अली यांनी सांगितले. सेंटरमध्ये व्हिडीओ वॉल, २० ऑपरेटर वर्कस्टेशन्स, वॉर रूम, इंटिग्रेटेड कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटर, डेटा सेंटर आणि यूपीएस व इलेक्ट्रिक रूम, ग्रंथालय, जीआयएस सेल असेल. रेनवॉटर हार्वेस्टिंग, ॲक्सेस कंट्रोल व अग्निसुरक्षा यंत्रणाही असेल. इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलने प्रमाणित केलेल्या हरित इमारतींपैकी ही एक इमारत असल्याचे सहायक प्रकल्प व्यवस्थापक इम्रान खान यांनी सांगितले.