शिक्षक मतदार संघासाठी ९४% मतदान
By Admin | Published: February 4, 2017 12:42 AM2017-02-04T00:42:50+5:302017-02-04T00:44:42+5:30
उस्मानाबाद : औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी जिल्हाभरातील ४२ केंद्रावर सुरळीत आणि शांततेत मतदान पार पडले.
उस्मानाबाद : औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी जिल्हाभरातील ४२ केंद्रावर सुरळीत आणि शांततेत मतदान पार पडले. ५ हजार ४९७ पैैकी ५ हजार ९६ जणांनी हक्क बजाविला. याचे प्रमाण ९४.७१ टक्के आहे.
शिक्षम मतदार संघासाठी आठ तालुक्यांतून मिळून सुमारे ५ हजार ४९७ मतदार होते. यामध्ये पुरूष मतदारांची संख्या ४ हजार ६३२ तर महिला मतदारांची संख्या ८६५ होती. मतदारांची ही संख्या लक्षात घेवून आठ तालुक्यांत मिळून ४२ केंद्र निर्माण करण्यात आली होती. या सर्वच केंद्रावर शिक्षक मतदारांनी उत्साहात मतदान केले. दिवसभरात ५ हजार ४९७ पैैकी ५ हजार ९६ जणांनी मतदानाचा हक्क बजाविला.
यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातून १ हजार ५९१ पैैकी १ हजार ४३५, तुळजापूर ८३९ पैैकी ७७४, उमरगा १ हजार २२ पैैकी ९४६, लोहारा ३६६ पैैकी ३४०, कळंब ६४६ पैैकी ६२५, भूम ३७० पैैकी ३५४, वाशी २७२ पैैकी २५० आणि परंडा तालुक्यातील ३९१ पैैकी ३७२ गुरूजींनी मतदान असून याचे प्रमाण ९२.७१ टक्के असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, ६ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे मतमोजणी होणार आहे. (प्रतिनिधी)