सामनगावात ९५ टक्के कुटुंबाकडे शौचालय

By Admin | Published: March 20, 2016 12:39 AM2016-03-20T00:39:44+5:302016-03-20T00:49:32+5:30

मुरुड : लातूर तालुक्यातील सामनगाव येथील तरुणांसह गावकऱ्यांनी गाव पाणंदमुक्त करण्याचा ध्यास घेतला आहे़

95 percent households have toilet facilities | सामनगावात ९५ टक्के कुटुंबाकडे शौचालय

सामनगावात ९५ टक्के कुटुंबाकडे शौचालय

googlenewsNext


मुरुड : लातूर तालुक्यातील सामनगाव येथील तरुणांसह गावकऱ्यांनी गाव पाणंदमुक्त करण्याचा ध्यास घेतला आहे़ त्यामुळे २५७ पैकी २४३ कुटुंबांत शौचालये बांधण्यात आली आहे़ याबद्दल युवकांचा गुरुवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे यांच्या हस्ते सत्कार झाला़
गावचे उपसरपंच शिवाजी बुलबुले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी शामराव पटवारी, प्रमोद हुडगे उपस्थित होते़ प्रास्ताविक गणेश बुलबुले यांनी केले़ सूत्रसंचालन जी.व्ही. साळुंके यांनी केले़ यशस्वितेसाठी युवराज बुलबुले, शिवानंद बुलबुले, ज्योतिर्लिंग बुलबुले, अरुण शेटे, दत्ता बुलबुले, धनंजय पांचाळ, दीपक बुलबुले, राहुल झुंजारे, नागेश झुंजारे, शांतवीर वाडीकर, रत्नदीप बुलबुले, तानाजी खरबड, सुनील झुंजारे, श्रीशैल्य पाटील आदींनी परिश्रम घेतले़

Web Title: 95 percent households have toilet facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.