अजिंठा बँकेत ९७.४१ कोटींचा घोटाळा, एकाच दिवसात आठ आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 12:18 PM2024-08-22T12:18:13+5:302024-08-22T12:18:32+5:30

चौकशीसाठी आयुक्तालयात बोलावून आठ ही आरोपींना पोलिसांनी अटक केली

97.41 crore scam in Ajantha Bank, eight accused arrested in one day | अजिंठा बँकेत ९७.४१ कोटींचा घोटाळा, एकाच दिवसात आठ आरोपी अटकेत

अजिंठा बँकेत ९७.४१ कोटींचा घोटाळा, एकाच दिवसात आठ आरोपी अटकेत

छत्रपती संभाजीनगर : अजिंठा अर्बन को-ऑप. बँकेतील ९७ कोटी ४१ लाख रुपयांच्या घोटाळाप्रकरणी बुधवारी एकाच दिवसात आठ आरोपींना अटक करण्यात आली. यात दोन व्यवस्थापकांसह अन्य अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले.

२ ऑगस्ट रोजी आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सीईओ प्रदीप कुलकर्णी यांना अटक करण्यात आली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. प्रशासकांना बँकेेच्या लेखा परीक्षणात नेटवर्थ रक्कम व सीआरएआर (भारित मालमत्ता प्रमाण) मध्ये मोठा फरक, तसेच ३६ कर्जदारांना ६४ कोटी ६० लाखांचे असुरक्षित कर्ज वाटप केल्याचे आढळून आले. बेकायदा कर्ज वाटप, इतर बँकांतील ठेवीच्या खोट्या नोंदी, खोटे ताळेबंद प्रमाणपत्र आणि आरबीआयला पाठविण्यात आलेला खोटा लेखापरीक्षण अहवाल या मुद्यांवरून प्रशासकांनी तक्रार दाखल केली होती.

या आठ जणांना घेतले ताब्यात
सोपान गोविंदराव डमाळे (६२, रा. जवाहर कॉलनी), मुख्य व्यवस्थापक संदेश भिवसन वाघ (५०, रा. बेगमपुरा), तत्कालीन शाखा व्यवस्थापक कल्याण ज्ञानेश्वर दांगोडे (५०, शहानूरवाडी), प्रशांत भास्कर फळेगावकर (५६, रा. देवानगरी), राजू सावळाराम बाचकर (४६, रा. सदानंदनगर), पोपट बाजीराव साखरे (५३, रा. एन-२), ज्ञानेश्वर ऊर्फ शरद सारजाराम पवार (३५, रा. शिवशंकर कॉलनी), गणेश आसाराम दांगोडे (३७, रा. म्हाडा कॉलनी) यांना बुधवारी पोलिस आयुक्तालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. चौकशी पूर्ण होताच सर्वांना बेड्या ठोकल्या. सहायक निरीक्षक मोसीन सय्यद, ज्ञानेश्वर अवघड, विजयानंद गवळी, सुनील फेपाळे यांनी ही कारवाई केली.

Web Title: 97.41 crore scam in Ajantha Bank, eight accused arrested in one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.