चलनातून बाद ९८ लाख ९२ हजाराच्या नोटा गुन्हे शाखेने केल्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 09:21 PM2020-07-01T21:21:12+5:302020-07-01T21:22:08+5:30

जालना रोडवरील हॉटेलमध्ये कारवाई

98 lakh 92 thousand notes confiscated by the crime branch | चलनातून बाद ९८ लाख ९२ हजाराच्या नोटा गुन्हे शाखेने केल्या जप्त

चलनातून बाद ९८ लाख ९२ हजाराच्या नोटा गुन्हे शाखेने केल्या जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देचौघे पोलिसांच्या ताब्यात

औरंगाबाद: चलनातून बाद हजार आणि पाचशे रुपयांची ९८ लाख ९२ हजार रुपयांच्या नोटा गुन्हेशाखेने एका हॉटेलवर छापा मारून जप्त केल्या . याप्रकरणी दोन महिलांसह चार जण पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे . प्रियंका सुभाष छाजेड (३०,रा . कामगार कॉलनी चिकलठाणा), नम्रतायोगेश उघडे (४० , रा . देवानगरी ) , मुश्ताक जमशीद पठाण( ५३ , रा टाईम्स कॉलनी ) आणि हशीम खान बशीर खान (४५ , रा . लक्ष्मण चावडी) अशी नोटासह पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या लोकांची नावे आहेत . 

प्राप्त माहिती अशी की , जालना रोडवरील पाटीदार भवन शेजारील हॉटेल ग्लोबल इन च्या पहिल्या मजल्यावर थांबलेल्या लोकांकडे मोठ्या प्रमाणात रोकड असल्याची माहिती खबऱ्याने गुन्हे शाखेला दिली . यानंतर पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद , उपायुक्त मीना मकवाना , पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मनोज शिंदे ,कर्मचारी नितीन मोरे , भगवान शिलोटे , विलास वाघ , प्रभाकर म्हस्के , विशाल पाटिल , आनंद वाहुळ , आणि नितीन देशमुख , आशा कुंटे , संजीवनी शिंदे यांच्या पथकाने आज दुपारी हॉटेलवर छापा मारला . यावेळी पहिल्या मजल्यावरील एका गाळ्यात दोन महिला आणि दोन पुरुष चलनातून बाद हजार आणि पाचशे च्या नोटा मोजत असल्याचे दिसले . त्यांच्याजवळ या नोटांची अनेक बंडले होती .

यावेळी पंचासमक्ष त्यांना या नोटासह ताब्यात घेऊन गुन्हे शाखेत नेण्यात आले . तेथे नोटांची मोजणी केली असता हजाराच्या ९ हजार ६ १० नोटा तर पाचशेच्या नोटांची संख्या ५६५ असल्याचे दिसून आले . ९८ लाख ९२ हजार ५०० रुपयांच्या जून्या नोटा आणि ३७ हजाराचे चार मोबाईल जप्त केले . त्यांच्याविरूध्द जवाहरनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुंह्याची नोंद केली .

Web Title: 98 lakh 92 thousand notes confiscated by the crime branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.