छत्रपती संभाजीनगर तालुक्यात बाजार समितीसाठी 98.61 टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 07:21 PM2023-04-28T19:21:04+5:302023-04-28T19:21:29+5:30

पालकमंत्री संदिपान भुमरे, भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे तसेच माजी आमदार डॉ. कल्याण काळे हे करमाड बुधवर ठाण मांडून बसले होते.

98.61 percent polling for market committee in Chhatrapati Sambhajinagar taluk | छत्रपती संभाजीनगर तालुक्यात बाजार समितीसाठी 98.61 टक्के मतदान

छत्रपती संभाजीनगर तालुक्यात बाजार समितीसाठी 98.61 टक्के मतदान

googlenewsNext

करमाड : जिल्ह्यात अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या छत्रपती संभाजी नगर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे मतदान अत्यंत चुरशीचे झाले. सोसायटी मतदार संघात 935 पैकी 925 तर ग्रामपंचायत मतदार संघातून १०८६ पैकी 1068 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. म्हणजेच सोसायटी व ग्रामपंचायतच्या एकूण 2021 मतांपैकी म्हणजेच 1993 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. एकूण टक्केवारी 98.61 येते. विशेष म्हणजे, जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे तसेच माजी आमदार डॉ. कल्याण काळे हे करमाड बुधवर ठाण मांडून बसले होते.

छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत भाजपा, शिवसेना व महाविकास आघाडी यांच्यात चुरशीचा सामना होईल हे स्पष्ट झाले होते. एक दुसऱ्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे तर प्रचारात अधिकच रंगत दिसून आली. मतदानासाठी करमाड येथे चार तर शहरातील सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये दोन अशा एकूण सहा बूथची व्यवस्था करण्यात आली होती.

मतदारांनी सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लावल्याचे दिसून आले .दुपारी एक वाजेला पावसामुळे मतदानात व्यत्यय आला होता .परंतु पाऊस उघडल्यानंतर पुन्हा मतदानास सुरळीत प्रारंभ झाला .मतदान अत्यंत शांततेत झाले असून पोलीस बंदोबस्त ही अत्यंत चोख होता .47 उमेदवारांचे भवितव्य शुक्रवारी मतपेटीत बंद झाले असून उद्या सकाळी सेंट फ्रान्सिस हायस्कूलवर मतमोजणी होणार आहे. दुपारपर्यंत सर्व निकाल जाहीर होतील. करमाड पोलीस ठाण्याचे अधिकारी आपल्या लवाज्यासह दिवसभर करमाड बूथवर ठाण मांडून होते .

Web Title: 98.61 percent polling for market committee in Chhatrapati Sambhajinagar taluk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.