९९ रास्त भाव दुकाने, ८0 रॉकेल परवाने देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 11:50 PM2017-08-03T23:50:29+5:302017-08-03T23:50:29+5:30
जिल्ह्यात रास्त भाव दुकाने व रॉकेल परवाने देण्याची प्र्रक्रिया सुरू झाली आहे. ११0 गावांत ९९ रास्त भाव दुकाने तर ८0 रॉकेल वितरण परवाने देण्यात येणार आहेत. मात्र यातील काही अपीलाची दुकाने वगळली जातील तर राजीनामा देणाºयांची नव्याने वाढण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात रास्त भाव दुकाने व रॉकेल परवाने देण्याची प्र्रक्रिया सुरू झाली आहे. ११0 गावांत ९९ रास्त भाव दुकाने तर ८0 रॉकेल वितरण परवाने देण्यात येणार आहेत. मात्र यातील काही अपीलाची दुकाने वगळली जातील तर राजीनामा देणाºयांची नव्याने वाढण्याची शक्यता आहे.
हिंगोली जिल्ह्यात यापूर्वीच यासाठी प्रक्रिया करण्यात येत होती. वसमत व औंढा तालुक्यातील प्रक्रिया जवळपास अंतिम टप्प्यात आली होती. यापूर्वी निर्विवादपणे महिला बचत गटांना प्राधान्य होते. त्यानंतर शासनाने नवा आदेश काढला. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांमुळे मागच्या आदेशात बदल केले होते. मात्र त्यातही नव्याने दिलेल्या निकषात एकीकडे पंचायत अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांना प्राधान्य देण्यास सांगितले आहे. तर या आदेशात खाली मात्र महिला व्यवस्थापनांना प्राधान्य देण्यास सांगितले आहे. त्यामुळे याबाबतची संदिग्धता कायम आहे. यावरूनही भविष्यात वाद उफाळण्याची शक्यता आहे. यावर चर्चा सुरू असतानाच शासनाने स्वस्त धान्य वितरण प्रणाली सुलभ करण्याच्या अनुषंगाने १0 आॅगस्टपासून नवीन दुकाने व रॉकेल परवाने देण्यासाठी वेळापत्रकच जाहीर केले.
यात वसमत तालुक्यात १५ गावांत, औंढा तालुक्यात २५ गावांत, कळमनुरी तालुक्यात ३२ गावांत, हिंगोली तालुक्यात १७ गावांत, सेनगाव तालुक्यात १६ गावांसाठी ही प्रक्रिया होणार आहे. यात काही ठिकाणी स्वस्त धान्य दुकाने तर काही ठिकाणी फक्त रॉकेल परवाने देण्यात येणार आहेत.
सर्व तहसीलकडून यासाठी माहिती गोळा करण्याचे काम जोरात सुरू आहे. यात अपील असलेली दुकाने वगळण्यासाठीही सांगण्यात आले आहे. तर काही ठिकाणी राजीनामा दिल्याने दुकाने बंद झाली असल्यास ती नव्याने या यादीत घेतली जाणार आहेत. यावेळी प्रचंड झुंबड उडण्याची चिन्हे दिसून येत आहेत.