९९% सातबारा आॅनलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 12:39 AM2017-07-30T00:39:44+5:302017-07-30T00:39:44+5:30
नांदेड: सातबारा आॅनलाईन करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून आजघडीला ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. मूळ सातबारात असलेली प्रत्येक बाब संगणकीकृत सातबारात समाविष्ट केली जात आहे. त्याचवेळी सन २०१४-१५ पासून ते चालू वर्षापर्यंतच्या पीकपेºयाची नोंद सातबारावर घेतली जात आहे.
अनुराग पोवळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: सातबारा आॅनलाईन करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून आजघडीला ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. मूळ सातबारात असलेली प्रत्येक बाब संगणकीकृत सातबारात समाविष्ट केली जात आहे. त्याचवेळी सन २०१४-१५ पासून ते चालू वर्षापर्यंतच्या पीकपेºयाची नोंद सातबारावर घेतली जात आहे.
जवळपास चार महिन्यांपासून सातबारा संगणकीकरणाचे काम महसूल विभागाकडून केले जात आहे. तलाठ्यामार्फत हे काम हाती घेण्यात आले असून सध्या पीक विमा, पीक कर्ज आदी विषयांमुळे हे काम थोडे बाजूला गेले असले तरीही येत्या काही दिवसांतच १०० टक्के सातबारा संगणकीकृत होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी व्यक्त केला आहे.
३१ जुलैपर्यंत १०० टक्के सातबारा संगणकीकृत करण्याचे उद्दिष्ट असून ९९ टक्के पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर, मुखेड, किनवट, माहूर, भोकर, हदगाव, हिमायतनगर, लोहा, बिलोली, धर्माबाद आणि उमरी तालुक्यात सातबारा संगणकीकरणाचे काम ९९ टक्क्यांहून अधिक झाले आहे. तर देगलूर, मुदखेड, कंधार, नायगाव या तालुक्यांतही ९६ ते ९८ टक्क्यापर्यंत काम पूर्ण झाले.
आजघडीला सर्वाधिक ५० हजार ३५५ सातबारा हे लोहा तालुक्यात संगणकीकृत करण्यात आले आहेत. त्या खालोखाल कंधार तालुक्यात ४९ हजार १३१, मुखेड- ४८ , हजार ६६२, हदगाव- ४२ हजार १४४, किनवट- ३९ हजार, ३५६, नांदेड- १८ हजार ८५८, अर्धापूर- ११ हजार ७९१, देगलूर- २६ हजार ४९१, माहूर- १६ हजार ९६, भोकर- १९ हजार ७७१, मुदखेड- १३ हजार ४१६, हिमायतनगर- १९ हजार ४७५, बिलोली -३१ हजार ७८२, नायगाव- २९ हजार ५०५, धर्माबाद तालुक्यात १८ हजार ४३५ आणि उमरी तालुक्यात १९ हजार १०१ सातबारा संगणकीकृत झाले आहेत.
जिल्ह्यात आजघडीला ४ लाख ५४ हजार १६९ सातबारा मंडळ अधिकाºयांनी प्रमाणित करुन संगणकीकृत केल्या आहेत. उर्वरित ४ हजार ७१२ सातबारा लवकरच संगणकीकृत केले जातील, असेही महसूल विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. महसूल विभागाने हाती घेतलेल्या संगणकीकृत सातबारामध्ये पीकपेºयाची तीन वर्षांची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. २०१४-१५, २०१५-१६ व २०१६- १७ च्या खरीप पिकांची माहिती उपलब्ध आहे.