संतापजनक! ७९ वर्षांच्या वृद्धावर दारुड्याकडून अनैसर्गिक अत्याचार; अंगावर केली लघुशंका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 11:55 AM2024-09-23T11:55:56+5:302024-09-23T11:56:33+5:30

सिडको परिसरातील घटना, पोलिसांनी आरोपीला केली अटक

A 79-year-old beggar was brutally assaulted by a drunkard | संतापजनक! ७९ वर्षांच्या वृद्धावर दारुड्याकडून अनैसर्गिक अत्याचार; अंगावर केली लघुशंका

संतापजनक! ७९ वर्षांच्या वृद्धावर दारुड्याकडून अनैसर्गिक अत्याचार; अंगावर केली लघुशंका

छत्रपती संभाजीनगर : रामगिरी हॉटेलच्या परिसरात झाेपलेल्या ७९ वर्षांच्या वृद्धावर एका दारुड्याने अनैसर्गिक अत्याचार केले. त्यानंतर जवळील एक हजार रुपये हिसकावून घेत त्यांच्या अंगावर लघुशंका केल्याचा गंभीर प्रकार शनिवारी रात्री घडला. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली. विक्रम ऊर्फ भुऱ्या धरमसिंग राजपूत (रा. सेव्हन हिल उड्डाणपुलाखाली) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित ७९ वर्षीय वृद्धाला मुलगा नाही. त्याची पत्नी मुकुंदवाडी परिसरातील मुलगी आणि जावयाच्या घरी राहते. दरम्यान, मुलगी आणि जावयासोबत पटत नसल्यामुळे वर्षभरापूर्वी वृद्धाने घर सोडले. तेव्हापासून ते बाहेरच भीक मागून खातात आणि रात्री सिडको बसस्थानक ते रामगिरी परिसरात जागा मिळेल तेथे अंथरूण टाकून झोपी जातात. २१ सप्टेंबरच्या रात्री ते रामगिरी हॉटेल परिसरात झोपी गेले. हॉटेलची गर्दी ओसरल्यानंतर सर्वजण तेथून निघून गेले.

मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी विक्रम ऊर्फ भुऱ्या दारूच्या नशेत तेथे आला. तेव्हा पीडित वृद्ध आणि आणखी एक, असे दोघेजण तेथे झोपलेले दिसले. आरोपीने दोन्ही वृद्धांना मारहाण केली. त्यामुळे दुसरा वृद्ध तेथून निघून गेला. आरोपीने पीडित वृद्धाला पकडले. त्यांना खाली पाडून कपडे फाडले. त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. वृद्धाने प्रतिकार करताच त्यांच्याकडील एक हजार रुपये हिसकावून घेतले. शेवटी वृद्धाच्या अंगावर लघुशंका केली. हा प्रकार समजल्यावर सिडको पोलिसांनी आरोपीला शोधून ताब्यात घेतले.

Web Title: A 79-year-old beggar was brutally assaulted by a drunkard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.