प्रवास्यांना मोठा फटका! औरंगाबादहून मुंबईसाठी सायंकाळची विमानसेवा मार्चअखेर बंद होणार

By संतोष हिरेमठ | Published: February 20, 2023 12:37 PM2023-02-20T12:37:22+5:302023-02-20T12:38:29+5:30

प्रवासी, उद्योजक, पर्यटकांना बसणार फटका; विमानसेवा कायम ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करण्याची गरज

A big hit for travelers! The evening flight service from Aurangabad to Mumbai will be discontinued by the end of March | प्रवास्यांना मोठा फटका! औरंगाबादहून मुंबईसाठी सायंकाळची विमानसेवा मार्चअखेर बंद होणार

प्रवास्यांना मोठा फटका! औरंगाबादहून मुंबईसाठी सायंकाळची विमानसेवा मार्चअखेर बंद होणार

googlenewsNext

औरंगाबाद : मुंबईसाठी सायंकाळच्या वेळेत सुरू असलेली इंडिगोची मुंबई- औरंगाबाद-मुंबई विमानसेवा मार्चअखेर बंद होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मुंबईला जाण्यासाठी पुन्हा एकदा पहाटेच्या विमानसेवेवरच औरंगाबादकरांना अवलंबून राहावे लागेल. याचा उद्याेग, व्यावसायिक, पर्यटकांना मोठा फटका बसेल. त्यामुळे आमदार, खासदारांनी यासाठी प्रयत्न करण्याची मागणी होत आहे.

इंडिगोचे सायंकाळी उड्डाण घेणारे विमान ३१ ऑक्टोबर २०२२ पासून सकाळी झेपावण्यास सुरुवात झाली होती. एअर इंडियाचे मुंबईचे विमानही सकाळीच आहे. त्यामुळे मुंबईला सायंकाळी जाण्यासाठी विमान उपलब्ध नव्हते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. विशेषत: मुंबईहून औरंगाबाद येणाऱ्या प्रवाशांना अगदी पहाटे तीन वाजता उठून सकाळचे विमान गाठावे लागत होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन औरंगाबाद टूरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या सिव्हिल एव्हिएशन कमिटीने सायंकाळच्या विमानसेवेसाठी प्रयत्न केले. अखेर १ डिसेंबर २०२२ पासून चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सायंकाळच्या वेळेस मुंबईसाठी इंडिगो कंपनीमार्फत विमानसेवा सुरू करण्यात आली. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी अशा दोन्ही वेळेत मुंबईसाठी विमान होते; मात्र आता मार्चअखेर सायंकाळचे विमान बंद करण्याच्या हालचाली इंडिगोकडून सुरू आहेत. मुंबई विमानतळावर या सेवेसाठी उन्हाळी वेळापत्रकात स्लॉट मिळत नसल्याचे सांगितले जाते.

पाठपुरावा सुरू
उन्हाळी वेळापत्रक अजून आलेले नाही; परंतु मार्चअखेर आणि एप्रिलमध्ये या विमानाची बुकिंग होत नाही. सायंकाळी मुंबईसाठी विमानसेवा असावी, यासाठी एअर इंडिया आणि इतर एअरलाईन्सकडे पाठपुरावा सुरू आहे, असे औरंगाबाद टूरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या सिव्हिल एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष सुनीत कोठारी यांनी सांगितले.

Web Title: A big hit for travelers! The evening flight service from Aurangabad to Mumbai will be discontinued by the end of March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.