मीटरमध्ये फेरफार, आकडे टाकून वीजचोरी; नारेगावात १९ जणांवर गुन्हे दाखल

By साहेबराव हिवराळे | Published: December 1, 2023 11:45 AM2023-12-01T11:45:14+5:302023-12-01T11:50:01+5:30

काही ग्राहक लघुदाब वाहिनीवर आकडे टाकून वीजचोरी करीत असल्याची माहिती महावितरणला मिळाली.

A case has been registered against 19 people who stole electricity in Naregaon | मीटरमध्ये फेरफार, आकडे टाकून वीजचोरी; नारेगावात १९ जणांवर गुन्हे दाखल

मीटरमध्ये फेरफार, आकडे टाकून वीजचोरी; नारेगावात १९ जणांवर गुन्हे दाखल

छत्रपती संभाजीनगर : नारेगाव परिसरातील विविध वसाहतीत महावितरणने वीजचोरी विरोधात धडक मोहीम राबवत एकाच वेळी १९ जणांवर गुन्हे दाखल केले. या कारवाईमुळे वीजचोरांमध्ये खळबळ उडाली आहे.

नारेगाव परिसरात काही ग्राहक मीटरमध्ये फेरफार करून तसेच लघुदाब वाहिनीवर आकडे टाकून वीजचोरी करीत असल्याची माहिती महावितरणला मिळाली. यावरून चिकलठाणा एमआयडीसी शाखेचे सहायक अभियंता सतीश अधाने, वरिष्ठ तंत्रज्ञ विनोद तित्तर, प्रेमचंद चव्हाण, अकील पठाण व विद्युत सहायक आय. एल. शेख यांनी १७ ते २२ नोव्हेंबर दरम्यान तपासणी मोहीम राबवली.

त्यात आयेशा कॉलनीतील अब्दुल जब्बार शेख, रफिक पटेल (वापरकर्ता सय्यद इम्रान अकिल), रंगरेज इश्तिकुए पीर मोहंमद, आयेशा मशीद जवळील मुन्नीबी अब्दुल गफार शेख, मोहंमद फारूख शेख इस्माईल, चमचमनगरमधील फारूख इस्माईल शेख, अजीज कॉलनीतील इम्रान मोहंमद खिझर, अमीर रहेमान शेख, साहिबा बेगम हसन चाऊस, नारेगावातील सलमान सलीम खान, मुसा इब्राहिम शेख, अख्तारी बेगम खान, अमिना पार्कमधील मोहंमद सादिक जफर, रुमाना परवीन अफरोज खान, इम्रान रफिक शेख, मुमताज बेगम शब्बीर शेख, अस्लम पार्कमधील कासिम रज्जाक शेख, अन्वर जानी मशीद जवळील सय्यद जावेद बशीर व असिफ कॉलनीतील सय्यद शफिक कैसर हे १९ जण हे वीजचोरी करताना आढळून आले.

या सर्वांनी घरगुती वापरासाठी विद्युत वाहिनीवर आकडे टाकून १ लाख १४ हजार रुपयांची वीजचोरी केली. या रकमेसह सर्वांना प्रत्येकी २ हजारांप्रमाणे ३८ हजारांचे तडजोड शुल्कही भरावे लागणार आहे. याप्रकरणी सहायक अभियंता सतीश अधाने यांच्या फिर्यादीवरून १९ जणांवर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A case has been registered against 19 people who stole electricity in Naregaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.