मुलगा व नवऱ्याला जिवे मारण्याची धमकी देत बांधकाम मिस्तरीचा कामगार महिलेवर अत्याचार
By राम शिनगारे | Published: November 28, 2022 09:18 PM2022-11-28T21:18:35+5:302022-11-28T21:18:44+5:30
मुकुंदवाडीत गुन्हा दाखल : नवऱ्यालाही दिली धमकी
औरंगाबाद : बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या महिलेला मुलगा व नवऱ्याला जिवे मारण्याची धमकी देत वारंवार अत्याचार करणाऱ्या मिस्तरीच्या विरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मुकेश काजळे (रा. हरदा, मध्यप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. दाखल फिर्यादीनुसार विवाहिता भावासोबत बांधकामवर मजुर म्हणून कामाला जात होती. त्याठिकाणी भावाचा मित्र असलेल्या मुकेश काजळेसोबत पीडिचेही ओळख झाली होती. त्यातुन मुकेश याने पीडितेला धमकावून शारीरीक संबंध प्रस्थापीत केले. त्यानंतर पीडितेचे अश्लिल छायाचित्र काढुन सतत ब्लॅकमेल करीत बीड बायपास रोडवरील हॉटेल मोदी ग्रेट लॉज याठिकाणी नेऊन वारंवार अत्याचार केले. त्यानंतर पीडितेने संबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर तिच्या भावासह नवऱ्याला फोनवरून शिवीगाळ केली. यानंतरही त्याने मोबाईलवरून फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्यामुळे पीडितेने पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. या प्रकरणी गुन्हा नोंदविल्यानंतर निरीक्षक ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक वैशाली गुळवे अधिक तपास करीत आहेत.