शिकार न सापडल्याने मरणासन्न अवस्थेतील बिबट्या आढळला; औषधोपचारानंतर अखेर शुद्धीवर

By साहेबराव हिवराळे | Published: August 30, 2022 11:45 AM2022-08-30T11:45:48+5:302022-08-30T11:47:51+5:30

शिकार न सापडल्याने मरणासन्न अवस्थेत बिबट्या रविवारी कृष्णापूरवाडी शिवारात आढळला.

A dying leopard was found after not finding its prey; Finally alive after medication | शिकार न सापडल्याने मरणासन्न अवस्थेतील बिबट्या आढळला; औषधोपचारानंतर अखेर शुद्धीवर

शिकार न सापडल्याने मरणासन्न अवस्थेतील बिबट्या आढळला; औषधोपचारानंतर अखेर शुद्धीवर

googlenewsNext

औरंगाबाद : शिकार न सापडल्याने मरणासन्न अवस्थेत गेलेला बिबट्या रविवारी कृष्णापूरवाडी शिवारात आढळला. वन विभागाच्या रेस्क्यू टीमने आहार, वैद्यकीय उपचार दिल्यावर तो शुद्धीवर आला.

या बिबट्याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब तौर यांनी तात्काळ वनरक्षक/ वनपाल तसेच वन्य प्राणी बचाव पथकाचे सदस्य यांना घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश दिले. बिबट्या आजारी असल्याचे दिसत होते. पशुवैद्यकीय अधिकारी रोहित धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याला उपचार करण्यासाठी पकडण्यात आले. आजारी बिबट्यावर पशुवैद्यकीय विभागाचे सहसंचालक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय अधिकारी रोहित धुमाळ उपचार करीत आहेत. सध्या बिबट्याची प्रकृती स्थिर असून तो औषधोपचाराला प्रतिसाद देत आहे.

मुख्य वनसंरक्षक सत्यजित गुजर,उपवनसंरक्षक सूर्यकांत मंकावार, सहायक वनसंरक्षक अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली. कारवाईच्या वेळी वनपाल राजेश देशमुख, वनपाल सुधीर धवन, वनरक्षक राठोड, चव्हाण, सूर्यवंशी, चोरमारे, भोसले, वाहन चालक अहिरे इत्यादी कर्मचारीही सहभागी होते.

Web Title: A dying leopard was found after not finding its prey; Finally alive after medication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.