सिडको परिसरातील व्हीआयपी अपार्टमेंटमध्ये चोरट्याने फोडला फ्लॅट

By राम शिनगारे | Published: April 25, 2023 07:55 PM2023-04-25T19:55:20+5:302023-04-25T19:55:33+5:30

सिडको एन ४ मधील घटना; पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल

A flat was broken into by a thief in a VIP apartment in CIDCO area | सिडको परिसरातील व्हीआयपी अपार्टमेंटमध्ये चोरट्याने फोडला फ्लॅट

सिडको परिसरातील व्हीआयपी अपार्टमेंटमध्ये चोरट्याने फोडला फ्लॅट

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : उच्चभ्रुंची वस्ती असलेल्या एन ४ सिडको परिसरातील व्हीआयपी अपार्टंमेंटमध्ये राहणाऱ्या व्यवसायिकाचा फ्लॅट फोडून चाेरट्यांनी ४८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना २२ ते २४ एप्रील दरम्यान घडली. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पुंडलिकनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन पंडित उजागरे (रा.दत्तकृपा अपार्टमेंन्ट, सिडको एन-४) हे घराला कुलूप लावून २२ ते २४ एप्रिल दरम्यान आपल्या गावी कन्नडला गेले होते. सचिन उजागरे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातून मंगळसूत्र, सोन्याची अंगठी, चांदीचे ब्रासलेट, लहान मुलाच्या हातातील चांदीचे कडे असा एकूण ४८ हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला आहे. 

चोरीची दुसरी घटना सिडकोतील विजयश्री कॉलनीत घडली. अविनाश नारायण कुलकर्णी (रा. फ्लॅट नंबर ४ ए, नॉर्थ अव्हेन्यू, विजयश्री कॉलनी, सिडको) यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी पाच हजार रूपये चोरून नेले. ही घटना २३ एप्रिलच्या दुपारी २ ते रात्री ११ वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला.

Web Title: A flat was broken into by a thief in a VIP apartment in CIDCO area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.