इन्स्टाग्रामवरील मैत्रिणीवर लग्नाच्या आमिषाने अत्याचार

By बापू सोळुंके | Published: June 30, 2024 02:37 PM2024-06-30T14:37:01+5:302024-06-30T14:37:15+5:30

सहायक पोलीस निरीक्षक एस.एस.देशमुख या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

A friend on Instagram was assaulted with the lure of marriage | इन्स्टाग्रामवरील मैत्रिणीवर लग्नाच्या आमिषाने अत्याचार

इन्स्टाग्रामवरील मैत्रिणीवर लग्नाच्या आमिषाने अत्याचार

छत्रपती संभाजीनगर: इन्स्टाग्रामवर भेटलेल्या मैत्रिणीला लग्नाचे आमिष दाखवून मित्रानेच तिच्यावर  अत्याचार केले. एवढेच नव्हे तर तिचा गर्भपात करून लग्नाला नकार देणाऱ्या तरूणांविरोधात मुकुंदवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदविला. 

विनय गायकवाड(रा. सिडको,एन ६)असे आरोपीचे नाव आहे. याविषयी प्राप्त माहिती अशी की, तक्रारदार महिला आणि आरोपीची इन्स्टाग्रामवर मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर दोघे परस्परांना भेटू लागले. विनय तिला फिरायला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला नेत असत.२९ मार्च रोजी धुलिवंदन सणानिमित्त आरोपीने तिला बळजबरीने मद्यपान करण्यास सांगितले. यानंतर तो तिला मुकुंदवाडी रेल्वे गेट नंबर ५६ जवळील निर्जन परिसरात घेऊन गेला. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. यानंतर तू मला फार आवडतेस, मला तुझ्यासोबत लग्न करायचे असे सांगून त्याने तिचा विश्वास संपादन केला. यानंतर त्यांच्यात अनेकदा संबंध आले.

यानंतर तो तिच्यासोबत मद्यपान करायचा, पिडिता नशेत असताना तो तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करायचा. या कृत्याचा तो त्याच्या मोबाइलवर व्हिडिओ चित्रण करायचा. हे व्हिडिओ तो व्हायरल करण्याची धमकी तो तिला देत आहे. यामुळे घाबरलेल्या पिडितने २९ जून रोजी मुकुंदवाडी पोलिसांत धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक एस.एस.देशमुख या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

गर्भपातही केला
गर्भवती असल्याचे समजल्यानंतर पीडितने त्याच्याकडे लग्नाचा आग्रह धरला. तेव्हा त्याने तिला खाजगी रुग्णालयात नेऊन तिचा गर्भपात केला. यानंतर तिने वारंवार त्याच्याकडे लग्नासाठी आग्रह केला असता त्याने लग्न करण्यास टाळाटाळ केली. यादरम्यान नातेवाईकानी त्याचे दुसऱ्रूा मुलीसोबत लग्न जुळवले. हा प्रकार पीडितेला समजातच तिने त्याच्याविरोधात  पोलिसांत तक्रार नोंदवली.

Web Title: A friend on Instagram was assaulted with the lure of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.