पतंगाच्या मांजाने कापला घोड्याचा पाय; जखमेवर 35 टाके घालून उपचार

By साहेबराव हिवराळे | Published: January 9, 2023 08:53 PM2023-01-09T20:53:37+5:302023-01-09T20:53:55+5:30

रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत घोडा फिरत होता.

A horse's leg cut by kite thread; doctor Treated the wound with 35 stitches | पतंगाच्या मांजाने कापला घोड्याचा पाय; जखमेवर 35 टाके घालून उपचार

पतंगाच्या मांजाने कापला घोड्याचा पाय; जखमेवर 35 टाके घालून उपचार

googlenewsNext


औरंगाबाद: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पायावर भली मोठी जखम आणि रक्तबंबाळ अवस्थेत घोडा चालताना दिसला. रविवार असल्याने पशुचिकित्सालयाचे कुणी मदतीला येत नसल्याने अखेर वाहनात टाकून सेंट्रल नाका येथील पशुचिकित्सालयात नेत ३५ टाके घालून त्याच्यावर उपचार करण्यात आले. पतंगाच्या मांजामुळे किंवा तारेमुळे घोड्याच्या पायाला जखम झाल्याची शक्यता आहे.

रविवारी सकाळी जखमी घोडा पाहून अमोल मिश्रा, शुभम तिवारी, वेलकम शैक्षणिक संस्थेचे अझर पठाण यांनी लाईफ केअर ॲनिमल वेल्फेअर असोसिएशन संस्थेचे जयेश शिंदे यांना घटनेची माहिती कळविली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचत महानगरपालिकेचे डॉ. शाहिद शेख यांच्याशी संपर्क साधला. परंतु, रविवार असल्यामुळे कर्मचारी नसल्याने डॉ. कादरी यांना बोलावण्यात आले.

Web Title: A horse's leg cut by kite thread; doctor Treated the wound with 35 stitches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.