छत्रपती संभाजीनगरात कर्नाटकी शैलीत उभारले भव्य रेणुका मंदिर; फेब्रुवारीत होणार प्राणप्रतिष्ठा

By प्रशांत तेलवाडकर | Published: October 5, 2024 06:27 PM2024-10-05T18:27:28+5:302024-10-05T18:28:51+5:30

देवी भक्तांसाठी आनंदाची बातमी; तीन मजली मंदिराची आता फक्त राहिली रंगरंगोटी

A magnificent Renuka temple built in Karnatak style at Chhatrapati Sambhajinagar; Pranpratistha will be held in February | छत्रपती संभाजीनगरात कर्नाटकी शैलीत उभारले भव्य रेणुका मंदिर; फेब्रुवारीत होणार प्राणप्रतिष्ठा

छत्रपती संभाजीनगरात कर्नाटकी शैलीत उभारले भव्य रेणुका मंदिर; फेब्रुवारीत होणार प्राणप्रतिष्ठा

छत्रपती संभाजीनगर : बीड बायपास येथील हरिहर सद्गुरू शक्तीपीठ रेणुका माता मंदिराचा संपूर्ण कायापालट करण्यात आला आहे. येथे तीन मजली भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. संपूर्ण मंदिर कर्नाटकी शैलीतील आहे. आता फक्त रंगरंगोटी राहिली आहे. भाविकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे फेब्रुवारी २०२५ या महिन्यात रेणुका मातेची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.

सुमारे ४ फुटाचा देवीचा नवीन तांदळा
सद्गुरू आप्पा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराची निर्मिती अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. मंदिरातील गाभारा मोठा आहे. त्यानुसार रेणुका मातेचा सुमारे ४ फुटाचा नवीन तांदळा तयार करण्यात येणार आहे. खुद्द महाराज हा तांदळा तयार करणार आहेत. त्याची प्राणप्रतिष्ठा फेब्रुवारी महिन्यात करण्यात येणार आहे. हे मंदिर छत्रपती संभाजीनगरचे आध्यात्मिक वैभव ठरणार आहे, अशी माहिती अंबरीश महाराज व अनिरुद्ध महाराज यांनी दिली.

वैशिष्ट्ये :
३००० चौ. फुटांचे ध्यान मंदिर
३००० चौ. फुटांचे सभामंडप.
३ हजार चौ. फुटांचे सत्संग, धार्मिक कार्यक्रमासाठी बैठक व्यवस्था

भविष्यातील उद्दिष्ट :
अभिनव गुरुपीठ
वेद पाठशाळा
यज्ञशाळा
गौ-शाळा
अन्नछत्र
मोफत संस्कार वर्ग
सामूहिक उपासना

Web Title: A magnificent Renuka temple built in Karnatak style at Chhatrapati Sambhajinagar; Pranpratistha will be held in February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.