Video: मोठा अनर्थ टळला; प्रवाशांना सोडून पुढे जाताच धावती खाजगी बस पेटली

By योगेश पायघन | Published: January 21, 2023 01:47 PM2023-01-21T13:47:01+5:302023-01-21T13:57:14+5:30

नागपूरहून औरंगाबाद आलेली हिमालया ट्रॅव्हल्स कंपनीची बस वाळूजकडे जाताना अचानक पेटली

A major disaster was averted; The private bus caught fire as it left the passengers | Video: मोठा अनर्थ टळला; प्रवाशांना सोडून पुढे जाताच धावती खाजगी बस पेटली

Video: मोठा अनर्थ टळला; प्रवाशांना सोडून पुढे जाताच धावती खाजगी बस पेटली

googlenewsNext

औरंगाबाद : वाळूजकडे डिझेल भरण्यासाठी जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला नगर नाक्या जवळील केंद्रीय विद्यालयासमोर शनिवारी सकाळी ७.३५ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन ट्रॅव्हल्स ची आग विझवली. दोन बंब आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लागले. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून ट्रॅव्हल्स मात्र भस्मसात झाली. 

अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी आर .के. सुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरहून औरंगाबाद आलेली हिमालया ट्रॅव्हल्स कंपनीची ट्रॅव्हल्स (एमएच २० जीसी ०५५५) शनिवारी सकाळी प्रवाशांना सोडल्यानंतर वाळूज कडे डिझेल भरण्यासाठी जात होती.नगर नाका ओलांडल्यानंतर केंद्रीय विद्यालयासमोर ट्रॅव्हल्सला अचानकपणे आग लागली. आधी ट्रॅव्हल्सच्या मागच्या बाजूस लागगलेली आग क्षणार्धात केबिन पर्यंत पोहचली. 

हा प्रकार लक्षात येतात बस चालक आणि क्लिनरने बस रस्त्याच्या कडेला उभी करून बाहेर धाव घेतली. तत्काळ घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाचे अधिकारी ड्युटी इन्चार्ज एल. पी .कोल्हे, विनायक लिमकर, अग्निशमन कर्मचारी संग्राम मोरे, शिवसंभा कल्याणकर, शेख अमीर, प्रसाद शिंदे ,सचिन शिंदे ,परमेश्वर साळुंखे ,शेख समीर, शेख आसिफ, अजय कोल्हे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन बसला लागलेली आग विझवली. या घटनेमध्ये  ट्रॅव्हल्सचे मोठे नुकसान झाले. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नव्हते.

Web Title: A major disaster was averted; The private bus caught fire as it left the passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.