याची देही याची डोळा! कैलास लेण्याची अद्वितीयता डोंगरावरून अनुभवता येणार,रस्त्याचे काम सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 01:26 PM2022-04-18T13:26:30+5:302022-04-18T13:27:06+5:30

वर्षभरात रस्त्याचे काम पूर्ण होईल अशी माहिती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने दिली आहे

A mountain road option to show tourists the uniqueness of Kailash Caves | याची देही याची डोळा! कैलास लेण्याची अद्वितीयता डोंगरावरून अनुभवता येणार,रस्त्याचे काम सुरु

याची देही याची डोळा! कैलास लेण्याची अद्वितीयता डोंगरावरून अनुभवता येणार,रस्त्याचे काम सुरु

googlenewsNext

औरंगाबाद : वेरूळ येथील कैलास लेणी ही अद्वितीय वास्तू आहे. कैलास लेणी वरच्या बाजूने पाहिल्यावर पर्यटकांना ते अद्वितीय व भव्य असल्याची अनुभूती होईल. त्यासाठी डोंगरावर एक रस्ता करण्याचा प्रस्ताव भारतीय पुरातत्व सर्वेक्षणकडऊन (एएसआय) तयार करण्यात आला असून, वर्षभरात हा रस्ता तयार होईल, असे एएसआयचे अधीक्षक डाॅ. मिलन कुमार चावले यांनी सांगितले.

आफ्रिका, तामिळनाडू आणि वेरूळ अशा जगभरात तीनच ठिकाणी कैलास लेणीसारखे एका दगडातील शिल्पाचे कोरीव काम झाले आहे. त्यापैकी कैलास हे सर्वात मोठे आहे. कळसापासून पायापर्यंत कोरीव शिल्प आहे. हे डोंगरावरून पाहिल्यावर हे जागतिक वारसा स्थळ का आहे, ते लक्षात येते. हे विहंगम दृश्य पर्यटकांना पाहता यावे यासाठी वरच्या बाजूने बघण्यासाठी सुरक्षित व्यवस्था निर्माण करण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. सध्या एक पाऊलवाट आहे. मात्र ती फारशी सुरक्षित नसून पर्यटकांनीही फारशी त्याबद्दल माहिती नाही. तिथे रस्ता करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या महाव्यवस्थापकांनी नुकतीच वेरूळ लेणीची पाहणी केली. हा त्यांचा धावता दौरा होता. यावेळी येथील प्रस्तावित कामांवर चर्चा झाली असून, ती कामे पुढील वर्षभरात मार्गी लागतील, असे चावले यांनी सांगितले.

पर्यटकांसाठी महाराष्ट्रदिनी ई-बस
वेरूळ लेणीतील बॅटरीवर चालणाऱ्या बसेस १४ मार्चपासून सुरू होणार होत्या. मात्र, अजूनही या बसच्या तपासणीचे काम सुरू आहे. १ मेपासून या बस सुरू होण्याची शक्यता आहे. हे सर्व वेंडरवर अवलंबून असून, लेणी परिसरात चढउतार अधिक असल्याने बसची क्षमता व बॅटरीच्या चाचण्या त्यांच्याकडून सुरू आहेत, असे एएसआयचे अधीक्षक डाॅ. चावले यांनी यांनी सांगितले.

Web Title: A mountain road option to show tourists the uniqueness of Kailash Caves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.