रंग बदलणारा दुर्मीळ शॅमेलिऑन सरडा; क्वचितच जमिनीवर उतरतो, दवबिंदू पिऊन भागवतो तहान

By साहेबराव हिवराळे | Published: August 2, 2023 06:59 PM2023-08-02T18:59:53+5:302023-08-02T19:01:46+5:30

अधिवासानुसार रंग बदलणारा शॅमेलिऑन म्हणजे सुद्धा निसर्गातलं एक आश्चर्यच!

A rare color-changing chameleon lizard was found in Chhatrapati Sambhajinagar | रंग बदलणारा दुर्मीळ शॅमेलिऑन सरडा; क्वचितच जमिनीवर उतरतो, दवबिंदू पिऊन भागवतो तहान

रंग बदलणारा दुर्मीळ शॅमेलिऑन सरडा; क्वचितच जमिनीवर उतरतो, दवबिंदू पिऊन भागवतो तहान

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : अतिशय दुर्मीळ असा समजला जाणारा शॅमेलिऑन हा रंग बदलणारा सरडा सातारा परिसरात दिसून आला. ज्युरासिक पार्कमधील डायनासोरच जणू ही छोटी प्रतिकृतीच भासत होती. या सरड्याला पकडून सातारा वनक्षेत्रात सोडण्यात आले.

हा अतिशय शांत आणि बिनविषारी जीव असून बरेच लोक त्याचा चमेलिओन असाही उच्चार करतात. काही ठिकाणी याला घोयरा सरडा म्हणतात. संपूर्ण भारतभर विविध प्रकारचे सरडे आढळतात. शॅमेलिऑन सरड्याचे खडबडीत दिसणारे शरीर दोन्ही बगलांकडून अगदी दाबून चपटे केल्यासारखे दिसते. एकावर एक तीन शिरस्त्राणे घातल्यासारखे दिसणारे डोके, कडबोळ्यासारखी वळलेली शेपूट, शरीराला न शोभणारे हडकुळे पाय, डायनोसारची आठवण करून देणारा जबडा, असे त्याचे स्वरूप असते.

मुंगळे, किडे, फुलपाखरू खाद्य
शॅमेलिऑन क्वचितच जमिनीवर उतरतो. अगदी तहान लागली तरीही झाडाच्या पानांवर पडलेले दवबिंदूच पितो. शक्यतो जमिनीवर न उतरणाऱ्या सरड्याची मादी अंडी घालण्यासाठी जमिनीवर उतरते व बिळ खोदून त्यात अंडी घालते. हा सरडा कधीच वेगाने धावत नाही. अगदी संशय घेत, चाहूल घेत, विचार करून हा सरडा प्रत्येक पाऊल टाकतो. कीटक, मुंगळे, फुलपाखरू हे त्याचे खाद्य. कुशल कसरतपटूप्रमाणे हा लवचीक फांद्यांवरही मस्त हालचाली करतो. तो वेगाने धावणारं भक्ष्य कसं पकडणार असा एक प्रश्न कुणाच्याही मनात येऊ शकतो. पण निसर्गाने त्याच्या प्रत्येक अपत्यासाठी काही ना काही तजवीज करून ठेवलेली असते. अधिवासानुसार रंग बदलणारा शॅमेलिऑन म्हणजे सुद्धा निसर्गातलं एक आश्चर्यच!

जीभ त्याचे एकमेव अस्त्र...
त्याची जीभ त्याचे एकमेव अस्त्र आहे. शॅमेलिऑनचे डोळे तेल भरायच्या कोन नरसाळ्याप्रमाणे एका शंकूच्या टोकावर बसवलेले असतात. या दुर्मिळ प्रजातीचे संरक्षण गरजेचे आहे.
-सर्पमित्र दीपक रत्नपारखे

Web Title: A rare color-changing chameleon lizard was found in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.