वाहन चोरट्यांचा धुमाकूळ; छत्रपती संभाजीनगरात एकाच दिवशी ७ दुचाकी चोरीस
By राम शिनगारे | Published: March 24, 2023 07:07 PM2023-03-24T19:07:00+5:302023-03-24T19:09:43+5:30
शहराच्या विविध भागातून दुचाकी वाहने लंपास करणाऱ्यात आल्याचे पुढे आले आहे
छत्रपती संभाजीनगर : शहरात वाहन चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. २३ मार्च रोजी शहरात ७ दुचाकी चोरीचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. मागील अनेक महिन्यांपासून दुचाकी चोरीच्या घटना वाढतच आहेत. त्यात दुचाकी चोरीचा उलगडा होण्याच्या प्रमाण अत्यल्प आहे.
मयंक राजेश अग्रवाल (रा.बन्सीलालनगर) यांची दुचाकी (एमएच २० सीके ५६६७) चोरट्याने २८ फेब्रुवारीच्या रात्री तर पवन राजेंद्र मिसाळ (रा.कार्तिकनगर, मयुरपार्क परिसर) यांची दुचाकी (एमएच २० ईक्यू ९५०२) चोरट्याने १७ मार्च रोजी एमजीएम हॉस्पीटलजवळून चोरून नेली. सुमित सुभाष निंदाने (रा.न्यु.नंदनवन कॉलनी) यांची दुचाकी (एमएच २० जीडी ७७०१) चोरट्याने २२ मार्चच्या रात्री घराजवळून चोरून नेली.
राजवीर दिनेशसिंग परदेशी (रा.आयुष अपार्टमेंन्ट, सुराणानगर) यांची दुचाकी (एमएच २० एफएक्स ०१०१) चोरट्याने सिग्मा हॉस्पीटल जवळून चोरून नेली. मारोती वसंतराव फड (रा.पवननगर, रांजणगाव-शेणपुंजी) यांची दुचाकी (एमएच ४४ जे ७५६४) चोरट्याने १९ मार्च रोजी घराजवळून चोरून नेली. बळीराम उत्तम राठोड (रा. फाईव्ह स्टार कॉलनी, राजनगर,मुकुंदवाडी) यांची दुचाकी (एमएच २० ईडी १९१०) चोरट्याने २० मार्च रोजी घराजवळून चोरून नेली. एका महिलेची दुचाकी (एमएच २० एफएच ८९८१) चोरट्याने २१ मार्च रोजी प्रोझोन मॉलजवळून चोरुन नेल्याचा गुन्हा पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला.
या ठाण्यात गुन्ह्यांची नोंद
शहराच्या विविध भागातून दुचाकी वाहने लंपास करणाऱ्या चोरट्याविरुद्ध अनुक्रमे सिडको पोलिस ठाण्यात २ तर छावणी, जवाहरनगर, एमआयडीसी वाळूज, मुकुंदवाडी आणि एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात प्रत्येकी १ असे सात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.