पैठण येथे दशक्रियाविधीसाठी आलेल्या कुटुंबावर कोयत्याने हल्ला; दोघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 07:30 PM2022-06-30T19:30:34+5:302022-06-30T19:32:00+5:30

पाच जणांवर गुन्हा दाखल अस्थी विसर्जनवेळी महिलेच्या गळ्यातील पोत चोरी केल्याच्या संशयावरुन वाद

A scythe attack on a family who came to Paithan for a rituals ; Both seriously injured | पैठण येथे दशक्रियाविधीसाठी आलेल्या कुटुंबावर कोयत्याने हल्ला; दोघे गंभीर जखमी

पैठण येथे दशक्रियाविधीसाठी आलेल्या कुटुंबावर कोयत्याने हल्ला; दोघे गंभीर जखमी

googlenewsNext

पैठण: औरंगाबाद येथून दशक्रिया विधीसाठी पैठण येथील गोदावरी नदीच्या मोक्षघाटावर आलेल्या कुटुंबावर कोयता व लाकडी दांड्याने हल्ला करण्यात आला आहे. हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यास औरंगाबाद येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरीच्या संशयावरुन झाला असल्याची माहिती आहे. 

औरंगाबाद येथील रामेश्वर गजानन फुटाणकर (रा. विश्रांतीनगर , मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन, पुंडलिकनगर पोलीस स्टेशन समोर) या कुटुंबातील मयत व्यक्तीच्या अस्थी विसर्जनासाठी गुरुवारी सकाळी गोदावरी नदी काठावरील नाथ मंदिराच्या पाठीमागे मोक्षघाटावर आले होते. यावेळी फुटांनकर कुटुंब गोदापात्रात अस्थी विसर्जन करीत असतांंना फुटाणकर कुटुंबातील महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरीस गेली. यावेळी एका तरुणांस पोत चोरली असेल तर परत कर असे फुटाणकर कुटुंबातील लोकांनी सांगितले. मात्र, तो पळून एका हाटेलमध्ये घुसला तेंव्हा या कुटुंबातील लोकांनी हाटेलमध्ये जाऊन त्या तरुणांस पोत परत कर नसता पोलिसांत तक्रार करण्यात येईल असे सांगितले. 

या कारणावरुन वाद झाला. संशयित पोत चोर व त्याचे कुटुंब यावेळी जमा झाले व तेथे जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत एका युवकांने कोयत्याने हल्ला करत दोन जणांना गंभीर जखमी केले. या हल्ल्यात संतोष गजानन फुटाणकर ( ४० ) व कुणाल रंगनाथ गाढेकर (३५) दोघे रा. विश्रांतीनगर औरंगाबाद हे गंभीर जखमी झाले. संतोष यास डोक्यावर जबर मार लागल्याने त्याची प्रकती गंभीर असून पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 

घटनेची माहिती मिळताच पो.नि. किशोर पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. घटनेनंतर तत्काळ विकास ज्ञानेश्वर जाधव, अक्षय सोमनाथ घोडके, आकाश ज्ञानेश्वर जाधव ( रा. संतनगर), विशाल विठ्ठल घोडके ( रा. साठेनगर पैठण) या चार आरोपींना अटक केली असून रवी लक्ष्मण जगधणे हा फरार झाला आहे. याप्रकरणी रामेश्वर गजानन फुटाणकर यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पो.नि. किशोर पवार, उपनिरीक्षक सतिष भोसले, पोहेका महेश माळी, पो.का. गोपाल पाटील, नरेंद्र अंधारे, अनिरुद्ध शिंदे, अंकुश शिंदे, गणेश कुलट आदी करीत आहे. 

दशक्रिया घाट असुरक्षित
पैठण येथील मोक्षघाटावर दशक्रिया विधीसाठी आलेल्या भाविकांना मारहाण करून लुटणे हा नित्याचाच प्रकार झाला आहे. मोक्षघाटावर गुन्हेगार, जुगारी, बुंगारी यांनी कब्जा केल्याचे वातावरण झाले आहे. मोक्षघाटावर पोलीस सुरक्षा द्यावी अशी मागणी अनेक वर्षापासून होत आहे.

Web Title: A scythe attack on a family who came to Paithan for a rituals ; Both seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.