Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा औरंगाबाद मुक्काम रद्द, थेट दिल्लीला जाणार; रविवारी पुन्हा येणार

By बापू सोळुंके | Published: July 30, 2022 06:56 PM2022-07-30T18:56:56+5:302022-07-30T18:58:36+5:30

CM Eknath Shinde ;: वैजापूर तालुक्यातील महालगाव येथिल सभा आटोपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने थेट औरंगाबाद विमानतळावर येतील.

A slight change in the Aurangabad tour of CM Eknath Shinde ; will go directly to Delhi without stopping at Aurangabad; Will come again on Sunday | Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा औरंगाबाद मुक्काम रद्द, थेट दिल्लीला जाणार; रविवारी पुन्हा येणार

Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा औरंगाबाद मुक्काम रद्द, थेट दिल्लीला जाणार; रविवारी पुन्हा येणार

googlenewsNext

औरंगाबाद: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांचा अचानक दिल्ली दौरा ठरलाय. यामुळे ते आज रात्री औरंगाबाद येथे नियोजित मुक्कामी नसतील. रात्री ते औरंगाबादहून दिल्लीला रवाना होतील. उद्या सकाळी परत औरंगाबादला येऊन नियोजित कार्यक्रमास मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहतील. 

नियोजित कार्यक्रमानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दि. ३० व ३१ जुलै रोजी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. पूर्ण दोन दिवसांत ते पाऊस, अतिवृष्टी, पीक-पाणी व विकासकामांचा विभागीय आढावा घेणार आहेत. मात्र, सायंकाळी अचानक त्यांच्या दौऱ्यात बदल झाला असून वैजापूर तालुक्यातील महालगाव येथिल सभा आटोपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने थेट औरंगाबाद विमानतळावर येतील. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला रवाना होणार आहेत. मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांचा दिल्ली दौरा अचानक ठरला असल्याची चर्चा आहे.

असा असेल रविवारचा नियोजित कार्यक्रम 
रविवारी ३१ जुलै रोजी सकाळी १० वाजता पाऊस, अतिवृष्टी, पीक-पाणी व विकासकामांचा विभागीय आयुक्त कार्यालयात ते आढावा घेतील. दुपारी १२.३० वाजता सिल्लोडकडे रवाना होतील. १.३० वाजता सिल्लोडमधील बाळासाहेब ठाकरे उद्यान लोकार्पण सोहळा, दुपारी २.३० वाजता आ. अब्दुल सत्तार यांच्या निवासस्थानी भेट दिल्यावर नगरपालिका इमारतीचे भूमिपूजन, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण, प्रवेशद्वाराचे लोकार्पण, नॅशनल सहकारी सूतगिरणी भूमिपूजन मुख्यमंत्री करतील. त्यानंतर नगर परिषद मैदानावर दुपारी २.४५ वाजता जाहीर सभेला ते संबोधित करतील. सायंकाळी ४.१५ वाजता ते सिल्लोड येथून औरंगाबादला येतील. हर्सूल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ते ७.१५ वाजता टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराज, अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास व भडकल गेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करतील. त्यानंतर आ. प्रदीप जैस्वाल यांच्या कार्यालयाला भेट देतील. पुढे ८.१५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून गुरुद्वारास भेट देतील. त्यानंतर ते आ. संजय शिरसाट यांच्या कार्यालयाकडे रवाना होतील. ९.१५ वाजता आ. संदीपान भुमरे यांच्या कार्यालयाकडे मुख्यमंत्र्यांचे आगमन होईल. रात्री ९.४५ वाजता आ. अतुल सावे यांच्या ज्योतीनगर न्यू एसबीएच कॉलनी येथील निवासस्थानी भेट देऊन ते रात्री ११ वाजता शासकीय विमानाने मुंबईला रवाना होतील.

Web Title: A slight change in the Aurangabad tour of CM Eknath Shinde ; will go directly to Delhi without stopping at Aurangabad; Will come again on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.