पावसाळ्यातच एक हजार रुपयाला टॅंकर; उन्हाळ्यात काय होणार?
By विकास राऊत | Published: September 11, 2023 03:01 PM2023-09-11T15:01:27+5:302023-09-11T15:05:01+5:30
महापालिका अनियमित पाणीपुरवठा करीत असल्यामुळे अनेक भागात टँकरविना पर्याय नाही.
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात आतापर्यंत ६२ टक्के पाऊस झाला आहे. सध्या ३० टॅंकर सुरू झाले आहेत. एका टॅंकरचा भाव एक हजार रुपये आहे. नागरिकांना सध्या खासगी टँकरने पाण्याची गरज भागवावी लागते आहे. महापालिका अनियमित पाणीपुरवठा करीत असल्यामुळे अनेक भागात टँकरविना पर्याय नाही.
आतापर्यंत जिल्ह्यात ६२ टक्के पाऊस ....
आतापर्यंत जिल्ह्यात ६२ टक्के पाऊस झाला आहे.
३६२ मिमी पाऊस ५८१ वार्षिक सरासरीच्या तुलनेत झाला आहे.
पावसाळ्यातच ३० टॅंकरने पाणी
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील ११, फुलंब्री तालुक्यातील १, पैठण २०, गंगापूर १ आणि सिल्लोड तालुक्यातील ६ गावांमध्ये ३० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
एका टॅंकरचा भाव एक हजार
सध्या ५ हजार लिटरचे टँकर ५००, तर १० हजार लिटरचे टँकर १ हजार रुपयांना मिळते आहे. येत्या उन्हाळ्यात यात वाढ होणे शक्य आहे.
शहराला सहा दिवसाआड पाणी
शहराला सहा दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. पावसाळ्यात नागरिकांना खासगी टँकरने पाण्याची गरज भागवावी लागते आहे.
उन्हाळ्यात काय होणार?
आमच्या भागात नळ योजना नाही. मनपाकडून टँकरने पाणीपुरवठा केला जातो. ते पाणी पुरत नाही, त्यामुळे खासगी टँकरने पाण्याची गरज भागवावी लागते.
- मधुकर गायकवाड
महिन्यातून एकदा तरी टँकर लागते
महिन्यातून एकदा खासगी टँकर मागवावे लागते. सध्या ही परिस्थिती आहे. यंदा पाऊस कमी झाला आहे, त्यामुळे उन्हाळ्यात काय होणार याची कल्पना करवत नाही.
- एल. बी. सोनवणे
कोणत्या तालुक्यात किती टॅंकर?
तालुका .............. टॅंकर
छत्रपती संभाजीनगर ...९
पैठण...,..............१४
गंगापूर...............१
फुलंब्री..............१
सिल्लोड..............५